Students eagerly await HSC results as Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education announces result date and time. saam tv
महाराष्ट्र

HSC Result date: बारावीचा निकाल उद्या, या अधिकृत लिंकवर ऑनलाइन पाहता येणार, गुणपत्रिका डाउनलोड कशी कराल?

Maharashtra HSC Results Out Tomorrow: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ एचएससी निकाल २ मे रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. १२वीचा निकाल ऑनलाइन कसा तपासायचा, हे टप्प्याटप्प्याने जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • बारावीचा निकाल २ मे रोजी सकाळी ११ वाजता जाहीर

  • महाराष्ट्र बोर्डाकडून अधिकृत घोषणा

  • विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. निकाल जाहीर व्हायला काही तास शिल्लक आहेत. मागील काही दिवसांपासून 12 वीचा निकाल कधी लागणार याबाबत चर्चा होती. गुरुवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एचएससी निकालाची तारिख आणि वेळ जाहीर केली आहे. त्यानुसार उद्या शनिवारी बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान तुम्ही तुमचा निकाल कोणत्या वेबसाइटवर पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार १२ वीचा निकाल २ मे रोजी ११ वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या वेबसाइटवर पाहता येणार यासंदर्भात जाणून घ्या. शनिवारी दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी तुम्हाला mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, mahahsscboard.in या संकेतस्थळाला भेट द्यावे लागेल. तेथे तुम्ही तुमचा सीट क्रमांक टाकून निकाल पाहू शकता.

mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, mahahsscboard.in वर गेल्यानंतर

'HSC Examination Result 2025' या लिंकवर क्लिक करा

तुमचा सीट नंबर किंवा रोल नंबर टाका

तुमच्या आईचे पहिले नाव टाका

'View Result' वर क्लिक करा

तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याचा स्क्रीनशॉट किंवा प्रिंटआऊट तुम्ही घेऊ शकता

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागात परीक्षा पार पडली. राज्यभरातून १४ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. निकाल लागल्यानंतर अनेकदा विद्यार्थ्यांना त्यांची उत्तरपत्रिका किंवा निकालामध्ये शंका असल्यास त्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असेन. यासाठी विद्यार्थ्यांना ३ मे ते १७ मे ही वेळ देण्यात आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाईट देखील सादर केली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी त्याच्या विभागामधील कार्यालयामध्ये संपर्क साधावा.

मोबाईलवर कसा पाहणार निकाल

परिक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी हे या पोर्टल्सवरून त्यांचा निकाल पाहू शकणार आहेत. त्याचबरोबर असेही सांगितले आहे की डिजीलॅाकर ॲप्लिकेशनद्वारे निकालपत्र विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालये देखील लॉगिनद्वारे मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: e-KYC ची मुदत 30 एप्रिलला संपली; 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र

Maharashtra News Live Update: पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत कोरेगाव शहरात तीन शाखांचे आणि एका संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन

Riteish Deshmukh: तुळजाभवानीच्या चरणी देशमुख कुटुंब! 'राजा शिवाजी'च्या यशासाठी रितेश-जेनेलियाने देवीचे दर्शन घेतले

Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेल्या बसला अज्ञात वाहनाची धडक; १६ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT