Raj-Uddhav Thackeray Alliance  X
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंचा ५ जुलैचा मोर्चा होणार की नाही? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर देत विषय संपवला

Maharashtra Political New : ५ जुलै रोजी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा निघणार होता. पण हिंदी सक्तीशी संबंधित दोन्ही जीआर रद्द झाल्याने हा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.

Yash Shirke

राज्य सरकारने केलेल्या हिंदी भाषेसक्तीविरुद्ध राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार होते. ५ जुलै रोजी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांकडून मुंबईमध्ये हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात मोर्चा निघणार होता. पण त्याआधीच आज (२९ जून) महायुती सरकारकडून हिंदी भाषेच्या सक्तीसंबंधित दोन्ही जीआर रद्द करण्यात आले. त्यानंतर ठाकरे बंधूंकडून आयोजित करण्यात आलेला ५ जुलैचा मोर्चा रद्द करण्यात आल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याशी संवाद साधण्यात आला. 'सरकारच्या निर्णयाचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसांच्या एकजुटीचा हा विजय आहे. एकजुटीमुळे सरकारला झुकावं लागलं आणि हा निर्णय रद्द करावा लागला. मराठी माणसं एकत्र आली आणि त्यांची एकजूट झाली, तर मराठीची गळचेपी कुणीही करु शकणार नाही. ५ जुलैच्या मोर्चाच्याशी संबंधित निर्णय राज ठाकरे घेतील', असे संदीप देशपांडे म्हणाले.

संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर थोड्याच वेळात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ५ जुलैचा मोर्चा रद्द झाल्याची घोषणा ट्वीट करुन केली. या पोस्टमध्ये त्यांनी 'हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द! हा मराठी एकजुटीचा विजय, ठाकरे एकत्र येणार याचा धसका, ५ जुलैचा एकत्रीत मोर्चा आता निघणार नाही;पण.. ठाकरे हाच ब्रँड!' असे म्हटले.

रविवारी २९ जून रोजी महायुती सरकारद्वारे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हजर होते. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेशी संबंधित त्रिभाषा सूत्राचे जीआर रद्द करण्याची मोठी घोषणा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकार आमच्यावर अन्याय करतंय, जरांगे उपोषण करण्यावर ठाम

konkan : दाट जंगलात हरवलेला सागरी किल्ला, कोकणातील 'हे' रहस्यमय ऐतिहासिक ठिकाण पाहिलात का?

Ladki Bahin Yojana : ४ दिवसांत मे महिना संपणार, 'लाडकी'च्या खात्यात ₹१५०० कधी जमा होणार? वाचा लेटेस्ट अपडेट

Deepali Sayyad : प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद यांना धमकीचे फोन; नेमकं काय प्रकरण?

'Deool Band 2' Movie Box Office Collection 7 Days: 'देऊळ बंद 2' चित्रपटाची गाडी सुसाट, पहिल्याच आठवड्यात कमावले तब्बल 'इतके' कोटी रूपये

SCROLL FOR NEXT