Palghar Rain News SaamtvNews
महाराष्ट्र

Palghar Rain News: पावसामुळे पालघर जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Schools Closed tomorrow in Palghar due to Heavy Rain: हवामान विभागाने पालघर जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे...

Rashmi Puranik

Maharashtra Rain Updates: पालघर जिल्ह्यातील सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 22/07/2023 रोजी पर्यंत पालघर जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याचा विचार करता, पालघर जिल्ह्यातीलसर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना दिनांक 22/07/2023 रोजी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सुट्टी जाहीर केली आहे. (Rain Updates News)

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली होती. त्यानंतर आता पावसाचा जोर कायम राहिल्याने शुक्रवारी म्हणजेच 22- 07- 2023 रोजीही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सर्व सरकारी व खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महानगरपालिका शाळा अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना दिनांक 22/07/2023 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात उद्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

गडचिरोली (Ganchiroli Rain) जिल्ह्यात संतधर पाऊस सुरू असल्याने शुक्रवारी सायंकाळी 23 मार्ग बंद झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट नुसार जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी उद्या 22 जुलै रोजी शाळा- महाविद्यालयाना सुटीची अधिसूचना जारी केली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्याच्या पाणीपातळीत वाढ झाली असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकांची तयारी सुरू, राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश, बिगूल कधी वाजणार? VIDEO

Waterfalls near Neral: गर्दी कमी आणि लांब जाण्याचीही गरज नाही! नेरळ-माथेरान जवळ आहेत 'हे' लपलेले धबधबे

Pune Shivneri Bus : दारु पिऊन शिवनेरी चालवत होता, प्रवाशांनी दारुड्या चालकाला रंगेहाथ पकडले अन् पुढे...

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; धाराशिवातील बड्या नेत्याकडून पदाचा राजीनामा

Gaganbawda Tourism: कोल्हापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण, या विकेंडला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT