Maharashtra Rain Update Saam TV
महाराष्ट्र

Weather Forecast: महाराष्ट्राला पुन्हा बसणार अवकाळी पावसाचा तडाखा; आज कुठे-कुठे कोसळणार पाऊस? वाचा वेदर रिपोर्ट

Weather Update 27 February 2024: भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज म्हणजेच मंगळवारी (२७ फेब्रुवारी) आणि बुधवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल.

Satish Daud

Maharashtra Rain Update 27 February 2024

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सध्या अनेक भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होत आहे. तर काही भागांना वादळी वाऱ्यासह गारपीटीने जोरदार तडाखा दिला आहे. अवकाळीमुळे शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झालं असून बळीराजा संकटात सापडला आहे. अवकाळीचं हे संकट पुढील काही दिवस कायम राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज म्हणजेच मंगळवारी (२७ फेब्रुवारी) आणि बुधवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Rain Alert) होईल. याचदरम्यान काही भागात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आलाय.

कोणकोणत्या जिल्ह्यांत कोसळणार पाऊस?

आयएमडीने जारी केलेल्या अंदाजनुसार, मंगळवार २७ आणि बुधवार २८ फेब्रुवारी रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. (Latest Marathi News)

याशिवाय विदर्भातील बुलढाणा , अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी (२६ फेब्रुवारी) राज्यातील बहुतांश भागात अचानक पावसाने हजेरी लावली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि कन्नड तालुक्यात तुफान गारपीट झाली. याशिवाय अकोला जिल्ह्यातील बाळापुर तेल्हारा आणि अकोट तालुक्यात, जालन्यात जाफराबाद तालुक्यात आणि बुलढाणा जिल्ह्यासह परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSRP Number Plate: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची डेडलाइन वाढली; रजिस्ट्रेशन कसं कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

नवऱ्याची क्रूरता... बेदम मारहाण करत बायकोच्या गुप्तांगामध्ये घातले 10 इंच ब्लेड

Saturn transit: त्रिग्रही योगात शनीचं गोचर; पुढचे 6 महिने 3 राशी कमावणार बक्कळ पैसा

Paneer Tikka Masala Recipe: घरी अचानक पाहुणे आलेत? जेवणासाठी टेस्टी करायचं आहे? मग झटपट बनवा पनीर टिक्का मसाला

Maharashtra News Live Update: पिंपरी-चिंचवडमध्ये आज अचानक इंधनाचा तुटवडा, जवळपास 80% पेट्रोल पंप बंद

SCROLL FOR NEXT