WARDHA RECORDS 46°C: SEVERE HEATWAVE GRIPS VIDARBHA saam tv
महाराष्ट्र

Heatwave : उष्णतेचा कहर! देशात वर्धा सर्वात उष्ण जिल्हा; तापमान 46 अंश सेल्सिअसवर

Maharashtra Heatwave News : विदर्भात प्रचंड उष्णतेची लाट कायम असून वर्ध्यात ४६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. नागरिकांना उकाड्याचा मोठा फटका बसत असून २१-२२ मेनंतर पावसामुळे दिलासा मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Alisha Khedekar

विदर्भात सध्या प्रचंड उष्णतेची लाट पाहायला मिळत असून वर्धा हे देशातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक ठरत आहे. वर्ध्यात तब्बल ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुपारच्या वेळेत तर बाहेर पडणेही नागरिकांसाठी कठीण होत आहे. या तीव्र उन्हाचा जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. रस्त्यांवरची वर्दळ कमी झाली असून नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळत आहेत. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता, डोकेदुखी, थकवा अशा समस्या वाढताना दिसत आहेत.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दक्षिण अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली असली तरी विदर्भात मात्र उन्हाचा कहर कायम आहे. अमरावती जिल्ह्यातही काल ४६ अंश तापमानाची नोंद झाली. पुढील पाच दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तथापि, २१ ते २२ मेनंतर विदर्भात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT