Scorching heat grips Maharashtra as Vidarbha records some of the highest temperatures globally. saam tv
महाराष्ट्र

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, जगातील 10 उष्ण शहरांत विदर्भातील 4 शहरे

Heatwave Intensifies: उन्हाचा कडाका वाढत चाललाय. महाराष्ट्र सर्वदूर तापलाय. त्यातही जगात विदर्भ सर्वाधिक उष्ण असल्याची नोंद झाली आहे. उन्हापासून बचावासाठी राज्य सरकारने SOP जाहीर केली आहे. पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam

एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच महाराष्ट्र सर्वदूर तापलाय. मुंबईपासून नागपूरपर्यंत नागरीक हैराण झालेत. मुंबईत 35 अंश तर उपराजधानी नागपूरमध्ये 41 अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात विर्दभात उन्हाचा तडाखा जास्त आहे. अकोला 44 अंश तापमानासह देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलंय. एव्हढच नाही तर जगातील पहिल्या 10 उष्ण शहरांत विदर्भातील 4 शहरांचा समावेश झालाय. हवामान विभागाने पुढील 8 दिवस उष्ण लाटेचा इशारा दिलाय. त्यामुळे पारा 45 अंशांच्या पार जाण्याची शक्यता असल्याने नागरिक धास्तावलेत. ..

विदर्भातील तापमान

अकोला44

यवतमाळ43

अमरावती43

वर्धा43

वाशिम43

गडचिरोली42

बुलढाणा42

नागपूर41

चंद्रपूर41

भंडारा41

ब्रह्मपुरी41

गोंदिया40

दरम्यान वाढत्या उष्णतेचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने SOP लागू केलीय. विशेषतः असंघटित मजूर, डिलिव्हरी बॉय आणि खाणकामगारांसाठी तीन स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे दक्षता घेण्याची सूचना जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना देण्यात आल्या आहेत.

उन्हाचा पारा वाढल्याने फळबाग आणि पिकांवरही त्याचा विपरती परीणाम होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणे आहे. तर विजेच्या मागणीतही मोठी वाढ होणार आहे. दुसरीकडे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळण्याचे आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन आरोग्य विभागानं केलंय. विशेषता उन्हामुळे मुलांना मळमळणं, चक्कर येणं आणि स्नायू दुखण्यासारखे त्रास जाणवतायत. मुलांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानं ते आजार जडू शकतात. त्यामुळे पालकवर्गाने सतर्क राहणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात अजून दीड महिना उन्हाचा तडाखा असणार आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि कूल राहा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नराधम खरातचा एन्काऊंटर होणार? बड्या नेत्यांना संशय

Mumbai: म्हाडाची बंद चौकी नशेखोरांचा अड्डा, रोखण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला

त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची लूट, 3 हजारात दर्शन देणारी टोळी रडारवर

Maharashtra Politics: डोक्यात हवा गेलेल्या मंत्र्यांना घरी बसवा, शिंदेंच्या आमदाराचा पक्षाला घरचा आहेर

रायगडावर प्री-वेडिंगचा उच्छाद; शिवरायांच्या पवित्र स्थळाचा अपमान

SCROLL FOR NEXT