Maharashtra News Saam Tv
महाराष्ट्र

Helicopter Ambulence : नोव्हेंबरपासून राज्यात महत्त्वाचा बदल, हेलिकॉप्टर अ‍ॅम्ब्युलन्सवर काय म्हणाले आरोग्यमंत्री?

Maharashtra News : महाराष्ट्रात नोव्हेंबरपासून हेलिकॉप्टरद्वारे एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू होणार आहे. यासह २०० अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात नोव्हेंबरपासून एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू होणार आहे.

  • दोन हेलिकॉप्टरद्वारे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांपर्यंत मदत पोहोचवली जाईल.

  • २०० अत्याधुनिक रुग्णवाहिका रस्त्यावर धावणार असून ५जी तंत्रज्ञानावर आधारित असतील.

  • या सेवेमुळे दुर्गम भागातील रुग्णांचे प्राण वाचवणे अधिक सुलभ होणार आहे.

नागरिकांसाठी आनंदाची बातमी! आता तुम्ही आजरी पडलात किंवा तुमच्यावर आपत्कालीन परिस्थिती ओढवली तर हवाई माध्यमातून रुग्णवाहिका तुमच्यापर्यँत क्षणार्धात पोहचणार आहे. नोव्हेंबर महिन्यापासून आपत्कालीन परिस्थितीत हवाई रुग्णवाहिका (एअर अ‍ॅम्ब्युलन्स) सेवेसह अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार आहे. असे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले आहे.

आबिटकर काय म्हणाले ?

आबिटकर यांनी सांगितले की, नोव्हेंबरपासून दोन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू केली जाणार असून, महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस १०८) अंतर्गत ही सुविधा उपलब्ध होईल. यासोबतच राज्यात नव्या स्वरूपातील २०० आधुनिक रुग्णवाहिका रस्त्यावर धावतील. आरोग्य विभागाकडे रुग्णवाहिकांच्या सेवेसंदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याने या सेवांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे.

नव्या रुग्णवाहिकेमध्ये या सुविधा असणार

नव्या रुग्णवाहिकांमध्ये मोबाईल डेटा टर्मिनल, टॅबलेट पीसी, जीपीएस, कॉलर लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही आणि ट्रायएज सिस्टीमसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल. तसेच या वाहनांमध्ये ग्राहक संबंध व्यवस्थापन, संगणकीकृत डिस्पॅच प्रणाली, वाहन ट्रॅकिंग आणि रुग्ण आगमनाची पूर्वमाहिती देणारी यंत्रणा बसवली जाईल. फाइव्ह जी तंत्रज्ञानावर आधारित या रुग्णवाहिकांमध्ये व्हेंटिलेटरसह २५हून अधिक वैद्यकीय उपकरणे असतील.

एअर अ‍ॅम्ब्युलन्सव्यतिरिक्त पाच समुद्री बोटी रुग्णवाहिका सेवेत

एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून दुर्गम भागातील रुग्णांचे प्राण वाचवणे सुलभहोईल. अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, यासाठी सुमीत एसएसजी बीव्हीजी या संस्थेसोबत १० वर्षांचा करार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात २०० रुग्णवाहिका सेवेत दाखल होतील. एअर अ‍ॅम्ब्युलन्सव्यतिरिक्त पाच समुद्री बोटीदेखील रुग्णवाहिका सेवेत समाविष्ट केल्या जाणार आहेत, असं आबिटकर यांनी सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratap Sarnaik: जिथं मीरा-भाईंदरमध्ये मराठीसाठी राज ठाकरेंनी सभा घेतली होती, तिथंच प्रताप सरनाईक म्हणाले 'मी हिंदीतच बोलतो अन् आयुक्तांना ... VIDEO

Maharashtra Live News Update : ४५ लाख शेतकऱ्यांना विमा उतरवला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांचा या ५ गोष्टी करा आत्मसात, १६-३० वयात पैशांची चणचण जाणवणारच नाही

Accident News : मुंबईत अपघाताचा थरार, टेम्पोची बससह अनेक वाहनांना धडक; ७ जणांना उडवले

Breaking News: शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी मदत, २५३ तालुक्यांना सरसकट नुकसान भरपाई; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT