maharashtra gujarat border dispute solsumba gram panchayat claim on vevji village area Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Gujarat Border: महाराष्ट्रातील गावांवर गुजरातचा दावा; दीड किमी घुसखोरी केल्याचा स्थानिकांचा आरोप

Maharashtra Gujarat Border Dispute: गुजरातमधील उंबरगाव येथील सोलसुंबा या ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायतीमध्ये जवळपास दीड किलोमीटर अतिक्रमण केल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

Maharashtra Gujarat Border Dispute: महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाप्रमाणेच, महाराष्ट्र आणि गुजरात सीमावादाचा मुद्दा सातत्याने समोर येत आहे. तलासरी तालुक्यातील गुजरातच्या सीमेवर असलेल्या काही गावांमध्ये गुजरातच्या ग्रामपंचायतीने घुसखोरी केल्याचं समोर आलं आहे.

गुजरातमधील उंबरगाव येथील सोलसुंबा या ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायतीमध्ये जवळपास दीड किलोमीटर अतिक्रमण केल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील गावांवर, भूभागावर गुजरात दावा सांगत असल्याचा मुद्दा डहाणूचे माकपाचे आमदार विनोद निकोले (MLA Vinod Nikole) यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली होती.

दरम्यान, तपासणी केल्यानंतर वेवजी गावात गुजरातच्या ग्रामपंचायतीने काम केले असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राच्या वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्ट्रीट लाईट बसण्याची परवानगी गुजरातमधील सोलसुंबा ग्रामपंचायतीने मागितली होती.

परवानगी मिळाल्यानंतर गुजरातच्या ग्रामपंचायतीने याठिकाणी काम सुरू केले. मात्र, विधानसभेत आमदार विनोद निकोले यांना हा मुद्दा उपस्थित सोलसुंबा गावाला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आल्याचं ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

तसेच शासनाला या भागातील सीमांकन करण्यासाठी पत्र देण्यात आलं असून पुढील गोष्टींचा पाठपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमा भागातील अनेक व्यवहार दोन्ही राज्यांच्या सीमेवरील गावांवर चालतात.

उंबरगाव शहराच्या जवळ तसेच वेवजी ग्रामपंचायतीच्या लगतच्या भागामध्ये दोन राज्यांमधील सीमेबाबत अस्पष्टता आहे. बोर्डी येथून तलासरीकडे जाताना गुजरात राज्यातून प्रवास करावा लागतो.

उंबरगाव रेल्वे स्थानक गाठताना महाराष्ट्रातील नागरिकांना गुजरातमध्ये जावे लागते. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमेवरून नेहमी वादाचे प्रसंग उभे राहत असतात. त्यातच आता गुजरातने महाराष्ट्राच्या हद्दीत घुसखोरीने हा वाद आणखी चिघळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT