राज्यात सहा वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांवर नवी जबाबदारी सोपवली.
तुकाराम मुंढे यांची परभणीच्या पालक सचिवपदी नियुक्ती.
जिल्हा स्तरावरील प्रलंबित बाबी जलद निकाली काढण्यासाठी पालक सचिव प्रणाली.
राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आलाय. मुख्य सचिव राजेश अगरवाल यांच्यासह आणखी ५ IAS अधिकाऱ्यांचीही वेगवेगळ्या जिल्ह्यांचे पालक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असलेल्या तुकाराम मुंढे यांची परभणीच्या पालक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा स्तरावरील शासकीय कार्यालयांच्या शासन स्तरावरील (मंत्रालय स्तरावरील) प्रलंबित बाबी तातडीने सोडवण्यासाठी तसेच शासनाचे धोरणात्मक निर्णय लवकरात लवकर घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी पालक सचिव यांची नियुक्ती करण्यात येत असते. शासनाचे धोरणात्मक निर्णय, प्रशासकीय सुधारणा आणि विविध लोकोपयोगी व कल्याणकारी योजना यांची क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पालक सचिवांकडे असते.
या पालक सचिवांना संबंधित जिल्ह्यात ३ महिन्यातून एकदा किंवा वर्षातून ४ वेळा जिल्ह्यात दौरा करावा लागतो. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेणे, त्याचा अहवाल सादर करणे, येत असलेल्या अडचणींवर उपाय सुचवायचे असतात. यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांसाठी पालक सचिवांची नियुक्ती केली होती. मात्र प्रशासकीय कारणास्तव यात काही अंशी बदल करण्यात आला. यातच तुकाराम मुंढे यांच्याकडे परभणीची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंढे यांनी यापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी, नाशिक, नागपूर या महापालिकांचे आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडलीय.
गडचिरोलीचे पालक सचिव म्हणून यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती केली होती. आता राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल हे गडचिरोलीचे पालक सचिव असतील.
मिलिंद म्हैसकर हे वर्ध्याचे पालक सचिव असणार आहेत. आधी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव हे पालक सचिव होते.
इकबाल सिंह चहल हे मुंबई शहरचे पालक सचिव होते. पण 31 मार्च 2026 रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी कौशल्य, रोजगार नाविन्यता व उद्योजगता विभागाच्या अ.मु.स. मनिषा वर्मा यांची नियुक्ती झाली.
परभणीचे पालक सचिव दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे असतील. आधी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दिपक कपूर यांच्याकडे ही जबाबदारी होती.
वाशिमचे पालक सचिव - मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्याकडे ही नवी जबाबदारी असेन. मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील हे व होते. आता दिली आहे.
रत्नागिरीचे पालक सचिव - इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज यांची नियुक्ती. आधी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व विशेष चौकशी अधिकारी (१) श्रीम. सीमा व्यास यांच्याकडे ही जबाबदारी होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.