Governor CP Radhakrishnan's comment on Marathi triggers political backlash; Thackeray, MNS demand apology Saam Tv
महाराष्ट्र

मराठी हिंदी वादात राज्यपालांची उडी,भाषिक वाद राज्यासाठी अहितकारी

Language War Intensifies: मराठी विरुद्ध हिंदी वादात आता थेट राज्यपालांनीच उडी घेतलीय... मात्र राज्यपालांनी नेमकं काय वक्तव्य केलंय? आणि ठाकरेंनी राज्यपालांना काय उत्तर दिलंय?

Omkar Sonawane

राज्यात पेटलेल्या मराठी विरुद्ध हिंदी वादात राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी उडी घेतलीय... कुणी मारझोड केली तर मला मराठी येईल का? असं म्हणत राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय.तर राज्यपालांनी भाषिक वादात उडी घेतल्याने आता विरोधकांनी राज्यपालांना कानपिचक्या दिल्यात...

राज्य सरकारने शिक्षणात त्रिभाषा सुत्राचा हवाला देत हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर भाषिक वादाची ठिणगी पडली... मात्र विरोधानंतर सरकारवर शासन निर्णय मागे घेण्याची नामुष्की ओढावली... दरम्यान परप्रांतियांकडून मराठी भाषेच्या अपमानाच्या घटना समोर आल्या... त्यामुळे मनसे, ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाणीचे प्रकारही घडले... मात्र आता या वादात राज्यपालांनी उडी घेतल्याने सरकारची कोंडी झालीय... त्यापार्श्वभुमीवर आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी मात्र मराठीचा सूर आळवलाय...

एकीकडे बिहार विधानसभा निवडणूक आणि दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या आधी फक्त सरकारच नाही तर आता घटनात्मक पदावरील राज्यपालांनीही या वादात उडी घेतल्याने भाषिक वादाचे सरकारलाच चटके बसणार हे मात्र निश्चित....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: रेल्वे प्रवासी मित्रांनो कृपा लक्ष द्या! मध्य,हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक; जाणून घ्या किती वेळ बंद असेल लोकल

Maharashtra Live News Update: - माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयाबाहेर पत्ते खेळून आंदोलन

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे हेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतात; शरद पवार गटाच्या आमदाराचा दावा

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत? रवींद्र चव्हाण म्हणाले,राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो | VIDEO

Maharashtra Politics : नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार? बडा नेता भाजपच्या वाटेवर, पक्षांतरावर नेत्याचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT