Maharashtra Mantralaya Reshuffle: Two Officers Transferred, Prasad Shinde Gets New Posting Saam TV
महाराष्ट्र

मंत्रालयात पुन्हा प्रशासकीय फेरबदल! दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रसाद शिंदेंची शालेय शिक्षण विभागात बदली

Mantralaya Reshuffle : महाराष्ट्र सरकारने दोन उपसचिवांच्या बदल्यांचे नवीन आदेश जारी केले आहेत. प्रसाद शिंदे यांची शालेय शिक्षण विभागात बदली करण्यात आली आहे, तर विजय भोसले यांची सार्वजनिक बांधकाम विभागात तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्र मंत्रालयातील दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय

  • प्रसाद रामचंद्र शिंदे यांची शालेय शिक्षण विभागात बदली

  • विजय निवृत्ती भोसले यांची सार्वजनिक बांधकाम विभागात पदस्थापना

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन सहसचिव आणि उपसचिव संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली आदेशात अंशतः बदल करण्यात आलेत. उपसचिव विजय निवृत्ती भोसले यांची सुधारित तात्पुरती पदस्थापना आता सार्वजनिक बांधकाम विभागात करण्यात आलाय. यासंदर्भात शासनाकडून आदेश जारी करण्यात आलाय. याआधी विजय निवृत्ती भोसले, उपसचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांची नगरविकास विभागात बदलीने पदस्थापना करण्यात आली होती.

मात्र, या बदली आदेशाला न्यायालयीन प्रक्रियेची पार्श्वभूमी निर्माण झाली. त्याचबरोबर उपसचिव प्रसाद रामचंद्र शिंदे यांची प्रशासकीय कारणास्तव आंतरविभागीय बदली करण्यात आलीय. त्यांची राजशिष्टाचार विभागातून शालेय शिक्षण विभागात पदस्थापना करण्यात आली आहे.

नगरविकास विभागातील सहसचिव सुब्बराव शिंदे यांनी त्यांच्या बदलीच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT), मुंबई येथे मूळ अर्ज क्रमांक ८७३/२०२६ दाखल केला आहे. या प्रकरणात न्यायाधिकरणाने जैसे थे (Status Quo) ठेवण्याचे आदेश दिलेत. दरम्यान, नगरविकास विभागात उपसचिव संवर्गातील पद रिक्त नसल्यामुळे विजय भोसले हे अद्याप पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे शासनाने त्यांच्या बदलीनंतरच्या पदस्थापनेत अंशतः बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातील मूळ अर्ज क्रमांक ८७३/२०२६ मधील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून विजय निवृत्ती भोसले यांची सार्वजनिक बांधकाम विभागात सुधारित तात्पुरती पदस्थापना करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विजय भोसले यांच्या पदस्थापनेचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात मार्गी लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोहर मामा भोसले प्रकरणात ED-CBI चौकशीची मागणी

PM Awas Yojana : पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा होणार

Kitchen Tips : फ्रिज नसतानाही भाज्या राहतील अनेक दिवस ताज्या; वापरा या सोप्या घरगुती ट्रिक्स

Salt Storage Vastu Tips: मीठ काचेच्या डब्यात ठेवावं की स्टीलच्या? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या कोणता पर्याय आहे शुभ

Testicular Cancer Risk : पुरुषांनो सावधान! 'या' वयात कर्करोगाचा सर्वाधिक धोका, दुर्लक्ष करू नका

SCROLL FOR NEXT