CM Samruddha Gram Yojana saam tv
महाराष्ट्र

Jaykumar Gore : चहापानावर बहिष्कार टाकण्यासाठी विरोधक शिल्लक तरी आहेत का?; जयकुमार गोरेंचा टोमणा

CM Samruddha Gram Yojana : १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी महाराष्ट्र सरकार 'मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना' सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धा होणार असून २५० कोटींची पारितोषिके दिली जाणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

येत्या १७ सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसा दिवशी महाराष्ट्र सरकार नवीन ग्रामविकास योजनेचा प्रारंभ करणार आहे. या योजनेत गावातील सर्वांगीण विकासासाठी विविध स्तरावर स्पर्धात्मक परीक्षण होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. त्याचबरोबर मंत्री गोरे यांनी विरोधकांना डिवचलं.

उद्या पासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे तत्पूर्वी महाराष्ट्र्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकार नवीन ग्रामविकास योजनेचा प्रारंभ करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर राज्य सरकार मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना सुरु करणार असल्याचे म्हटले. या योजनेत गावातील सर्वांगीण विकासासाठी विविध स्तरावर स्पर्धात्मक परीक्षण होणार आहे. या स्पर्धेचं उद्दिष्ट गावांचा सर्वांगीण विकास करणे आहे. या स्पर्धेतून राज्य सरकार जवळपास २५० कोटींची बक्षीस देणार असल्याची माहिती मंत्री जयकुमार गोरेंनी दिली.

मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेत राज्यस्तरावर पहिल्या येणाऱ्या गावाला ५ कोटींचं बक्षीस मिळणार. विभाग पातळीवर पहिला क्रमांक येणाऱ्या गावाला १ कोटींचं बक्षीस मिळणार आहे . तर जिल्हा पातळीवर प्रथम येणाऱ्या गावाला ५० लाखांचे बक्षीस मिळणार आहे. तर तालुक्यातून प्रथम येणाऱ्या गावाला मिळणार २५ लाखांचं बक्षीस मिळणार आहे. आर.आर.‌ पाटील ग्रामविकास मंत्री असतांना राबवलेल्या 'संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान' आणि 'निर्मल ग्राम योजने'च्या पातळीवर या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.

दरम्यान, हिंदी सक्तीच्या विषयावरून विरोधकांचा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न असल्याचा जयकुमार गोरे यांनी म्हटले. चहापानावर बहिष्कार टाकण्यासाठी विरोधक शिल्लक तरी आहेत का?, असा टोमणा मारत जयकुमार गोरेंनी विरोधकांना डिवचलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT