Land Survey  Saam tv
महाराष्ट्र

कौटुंबिक वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार; 'डेडलाईन' फॉर्म्युलाही ठरला, मोजणीचे नवे दर जाहीर

Land Survey : आता राज्यात कौटुंबिक वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार आहे. वाटणीचा 'डेडलाईन' फॉर्म्युलाही देखील ठरला आहे.

Vishal Gangurde

मोजणीच्या शुल्क आणि वर्गीकरणात बदल

कौटुंबिक वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपयांत शक्य

'डेडलाईन' फॉर्म्युलाही ठरवण्यात आलाय

राज्य शासनाने जमीन मोजणीच्या शुल्क आणि वर्गीकरणात मोठे बदल केले आहे. शासनाच्या निर्णयाने सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. नव्या नियमानुसार कुटुंबातच झालेल्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपयात होणार आहे. तर 'नियमित मोजणी' ९० दिवसांत आणि 'द्रुतगती मोजणी' ३० दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आलंय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. नव्या मोजणी प्रक्रियेतील उशीर आणि भ्रष्टाचाराला पूर्णपणे आळा बसेल, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केलाय.

निर्णयानुसार, ग्रामीण भागात २ हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी २,००० रुपये निश्चित केले आहेत. तर शहरी भागात १ हेक्टरपर्यंत ३,००० रुपये शुल्क निश्चित करण्यात आलंय.

कौटुंबिक वाटणी मोजणीसाठी कोर्ट वाटप किंवा संमतीने होणाऱ्या मोजणीसाठी प्रति पोटहिस्सा अवघे २०० रुपये आकारले जाणार आहेत.

ग्रामीण मोजणी दरासाठी २ हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी २,००० रुपये, तर द्रुतगतीसाठी ८,००० रुपये शुल्क आकारले जाणार आहेत.

शहरी मोजणी दरासाठी १ हेक्टरपर्यंत नियमित मोजणीसाठी ३,००० रुपये, तर द्रुतगतीसाठी १२,००० रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. पुनर्भेट शुल्क झटका प्रकरणात अर्जदार मोजणीच्या दिवशी गैरहजर राहिल्यास मूळ फीच्या ५०% किंवा कमाल १०,००० रुपये दंड आकारले जाईल.

भूमापक गैरहजर राहिल्यास सवलत दिली जाईल. मोजणीच्या दिवशी अधिकारी अनुपस्थित राहिल्यास अर्जदाराला कोणतेही पुनर्भेट शुल्क लागू होणार नाहीत. गुंठेवारी मोजणीसाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत येणाऱ्या भूखंडांच्या मोजणीसाठी दीडपट शुल्क लागू केली जाईल.

उच्चतपासणी फीसाठी कनिष्ठ भूमापकाच्या मोजणीवर आक्षेप असल्यास तपासणीसाठी ३ ते ५ पट अधिक शुल्क आकारले जातील. निमशासकीय संस्थांना मोजणी दरात ५०%, तर पूर्णतः शासकीय जमिनींना ७५% सवलत मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Farmer Issue: शेतकऱ्याला 50 लाखांचं 'चंदन', नशिबाचा झाला खेळ; पैसे परत करण्याची वेळ

उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं; ३ खासदार दिल्लीत, २ नॉट रिचेबल, उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटणार?

PNG-CNG Price Hike: महागाईचा स्फोट! CNG तिसऱ्यांदा महागला, PNG प्रति किलो 51.50 रुपयांवर

नांदेडचे नगरसेवक हॉटेल पॉलिटिक्सचे लाभार्थी; विधानपरिषद निवडणुकीत लाडक्या नगरसेवकांची चंगळ, VIDEO

Smart Meter Maharashtra: महावितरणचा सुलतानी फर्मान! स्मार्ट मीटरसाठी 48 तासांचा अल्टिमेटम, ग्राहकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT