MAHARASHTRA FARMER LOAN WAIVER: SECOND INSTALLMENT RELEASED FOR 6 LAKH+ FARMERS saam tv
महाराष्ट्र

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; 6 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

Maharashtra Farmer Loan Waiver: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला असून 6 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

Bharat Jadhav

  • शेतकरी कर्जमाफी योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे.

  • ६ लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हा लाभ देण्यात आला.

महायुती सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केलीय. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळत असून ते कर्जमुक्त होत आहेत. या योजनेचा दुसरा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीचं वितरण आज करण्यात आलं.

या टप्प्यात 5086 कोटी रुपये वितरित करत 6 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यानंतर पहिल्या टप्प्यात 7 ऑगस्टला 5029 कोटी वितरीत करण्यात आले होते. त्यावेळी 6 लाख 22 हजार 207 शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती. आज दुसऱ्या टप्प्यात 6 लाख 36 हजार 36 पात्र शेतकऱ्यांना 5086 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आलाय.

कर्जमाफी योजनेसाठी टप्प्या टप्प्यानं निधी वितरीत केला जातोय. या कर्जमाफीमध्ये साधारणपणे 32 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे. 23 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. सरकारच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना होईल असा अंदाज आहे.

आतापर्यंत किती शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीय?

आतापर्यंत दोन टप्प्यात 10115 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ 12 लाख 58 हजार 243 शेतकऱ्यांना देण्यात आलाय. कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असून लाभार्थींची संख्या सातत्याने अद्ययावत होत असल्याची माहिती देण्यात आलीय. योजनेची संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शक आहे.

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत नियंत्रित केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर राज्यातील शेतकरी संघटनांकडून विविध ठिकाणी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर राज्य सरकारनं 30 जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचं आश्वासन पूर्ण केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT