Maharashtra Fallow Land Rule: Government May Take Over Land Left Unused For 3 Years 
महाराष्ट्र

Agricultural Land: जमीन खरेदी करून पडीक ठेवणाऱ्यांनो सावधान! सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Agricultural Land : चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन वर्षांपासून पडीक ठेवलेल्या शेतजमिनींविरुद्ध सरकारकडून संभाव्य कारवाईचे संकेत दिलेत. प्रस्तावित जमीन नियम, कर अहवाल आणि गोशाळा अनुदानांविषयी जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • जमीन नोंदणी विभागातील आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण आणण्याची सरकारची तयारी

  • दोन लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला देणे बंधनकारक करण्याचा विचार

  • गोशाळांना २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याची भूमिका स्पष्ट

शेती करायची म्हणून तुम्ही जमीन खरेदी केली असेल आणि शेती तशीच पडीक ठेवली असेल तर सावधान. कारण जमीन खरेदी करून वर्षानुवर्षे ती पडीत ठेवणाऱ्या बड्या व्यापाऱ्यांना आता सरकार देण्याच्या तयारीत आहे. सलग तीन वर्षे जमीन पडीक ठेवली तर ती जमीन सरकारजमा केली जाईल अशी तरतूद लागू करण्याबाबत राज्य सरकार विचारात आहे. हो, अगदी बरोबत तुम्ही वाचत आहात, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खुद्द याबाबत संकेत दिलेत.

यासह नोंदणी विभागातील आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला देणे बंधनकारक करण्याची तयारीही सरकारने केलीय. गोशाळांना २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान आणि गोवंश संरक्षणासाठी कठोर कारवाईची भूमिकाही बावनकुळेंनी स्पष्ट केली होती.

राज्यात काही मोठे व्यापारी शेतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करतात; मात्र प्रत्यक्ष शेती न करता त्या जमिनी वर्षानुवर्षे पडीत ठेवत असतात. या प्रकारावर सरकारने लक्ष केंद्रित केलंय. नियमानुसार तीन वर्षांपेक्षा अधिक काळ जमीन पडीत ठेवता येत नसल्याचा उल्लेख करत, तीन वर्षे शेती केली नाही तर संबंधित जमीन सरकारजमा करण्याची तरतूद लागू करण्याबाबत विचार सुरू असल्याचं बावनकुळे म्हणालेत.

पाऊस पुरेसा झाल्यास शेतकऱ्यांनीही जमीन पडीत न ठेवता शेती करावी, असे आवाहन त्यांनी केलंय. त्यामुळे शेतीच्या नावाखाली जमीन खरेदी करून तिचा शेतीसाठी वापर न करणाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

गोशाळांना २५ लाखांपर्यंत अनुदान

राज्यातील अधिकृत गोशाळांना २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. आतापर्यंत सुमारे ७०० गोशाळांची गोशाळा आयोगाकडे नोंदणी झालीय. गोशाळांसाठी जमीन खरेदी, चाऱ्याची व्यवस्था आणि गोवंशाच्या संगोपनासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीत जनावरांची विक्री होऊ नये आणि गोवंशाचे संरक्षण व्हावे, यासाठी सरकार व गोशाळा संयुक्तपणे काम करणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिलीय.

गोहत्या आणि गोतस्करी करणाऱ्यांविरोधात सरकार कठोर भूमिका घेणार आहे. गोहत्येच्या उद्देशाने चुकीच्या पद्धतीने जनावरांची खरेदी करणाऱ्यांवर मोक्का लावण्याबाबतही विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमिती काम करत असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध क्रिकेटपटूची राजकारणात एण्ट्री; हाती घेतलं कमळ,भाजपमध्ये सामील होताच मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

SCROLL FOR NEXT