Irshalwadi news today,  saam tv
महाराष्ट्र

Irshalwadi Response Fund: इर्शाळवाडीला आधार द्यायचा आहे, त्यांचे आयुष्य पुन्हा उभे करायचे आहे ? जाणून घ्या मदतीसाठीची प्रक्रिया

Irshalwadi Helpline: अनेकांना इर्शाळवाडीत मदत करायची असल्याने जिल्हा प्रशासनाने उचलले ठाेस पाउल.

Siddharth Latkar

Raigad News : खालापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे मौजे चौक-नानिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील मौजे इर्शाळवाडी (ता.खालापूर) येथे दरड कोसळून (Landslide in Irshalwadi village) मोठया प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. या घटनेत पशुधनाची व खाजगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. या घटनेतील जनतेस आधार देवून आयुष्यात त्यांनी पुन्हा उभारी घ्यावी यासाठी आर्थिक मदत व साहित्याच्या स्वरुपात मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. (Maharashtra News)

इर्शाळवाडी (ता.खालापूर) येथील ग्रामस्थांना समाजातील सामाजिक संस्था, ट्रस्ट, फाँऊंडेशन्स, सीएसआर, दानशूर व्यक्ती यांच्याकडून आर्थिक मदत व साहित्याच्या स्वरुपात मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ज्यांना आर्थिक स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी पुढील खात्यांवर मदत द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

आर्थिक मदत

जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी (District Disaster Response Fund) बँकचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा,अलिबाग (State Bank of India, Alibag), बँक खात्याचा नंबर:- 38222872300, IFSC Code:-SBIN0000308 या बँक खात्यामध्ये निधी जमा करावा.

साहित्य स्वरुपात मदत

ज्या संस्थांना साहित्य स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी उपविभागीय अधिकारी कर्जत अजित नैराळे मोबाईल क्रमांक 8390090040, खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी मोबाईल क्रमांक 9975751076 यांच्याशी संपर्क करुन ठिकाणी मदत पोहोच करावी असे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी आवाहन केले आहे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT