कापसाला व सोयाबीनला योग्य हमी भाव मिळावा तसेच शेतक-यांचे अन्य प्रश्न सुटावेत यासाठी आंदाेलन छेडण्या-या शेतकरी नेते रविकांत तुपकर (ravikant tupkar latest marathi news) यांना राज्य शासनाने उद्या (ता. 29) सहयाद्री अतिथीगृह येथे चर्चेसाठी बाेलावले आहे. त्याबाबतचे पत्र तुपकर यांना बुलढाणा जिल्हा प्रशासनाने आज (मंगळवार) दिले. आज सकाळी तुपकर हे सोमठाणा येथून मुंबईस शेकडो शेतक-यांसमवेत मंत्रालयात आंदाेलनासाठी रवाना झालेत. (Maharashtra News)
रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूस प्रशावर सुरु केलेल्या आरपार लढाईचा निर्णय घेत आंदोलन उभे केले असून त्यांच्या आंदोलनाला मराठा आंदाेलनकर्ते मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी फोन करून पाठींबा दिला. यावेळी जरांगे पाटील यांनी तुपकर यांच्या तब्येतीची विचारपूस करीत काळजी घ्यावी असा सल्ला दिला.
उद्या सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
दरम्यान आज दुपारी रविकांत तुपकरांना राज्य सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. त्याबाबतचे पत्र उपजिल्हाधिकारी सुनील विंचनकर व अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी जांब या गावात रविकांत तुपकर यांना दिले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यानूसार उद्या रविकांत तुपकरांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक हाेईल असे मानले जात आहे. रविकांत तुपकर यांनी शेतक-यांना मार्गदर्शन करताना सरकारसाेबत चर्चेला जाणार असल्याचे म्हटले. आपल्या बाजूने निर्णय झाला तर ठीक नाही तर आपण (शेतकरी) मंत्रालयाचा ताबा घेणार म्हणजे घेणार तसेच अन्नत्याग सुरूच ठेवणार अशी भूमिका तुपकर यांनी जाहीर केली.
रविकांत तुपकरांचा असा असणार दाैरा
बुलढाणा -सिल्लोड - संभाजीनगर - नगर - चाकण मार्गे लोणावळा. लाेणावळा येथे रविकांत तुपकर हे आज (मंगळवार) मुक्कामी असतील. उद्या (ता. २९) सकाळी तुपकर शेतक-यांसमवेत मुंबईतील मंत्रालयाकडे कूच करतील.
मनाेज जरांगे पाटील यांचा पाठींबा
रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खाेत (sadabhau khot), सप्त खंजेरी वादक सत्यपालं महाराज यांच्यासह मराठा आंदाेलनकर्ते मनाेज जरांगे पाटील यांच्यासह अनेकांनी रविकांत तुपकर यांच्या आंदाेलनास पाठिंबा दिला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.