Maharashtra Government Formation : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याची जितकी राज्यात चर्चा सुरु आहे. तितकीच चर्चा महाराष्ट्रात मंत्री कोण कोण होणार? याचीही चर्चा आहे. पालकमंत्री आणि मंत्रिपदावरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. कोणाला कोणतं खातं मिळणार? राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कोणती खाती दिली जाणार? मुख्यमंत्रीपद भाजपला जाणार? यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालेच आहे. पण आता मंत्रिपदासाठी महायुतीमध्ये अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. (Maharashtra Government Ministers)
अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्यासोबत राज्यातील मंत्रिमंडळावर चर्चा होणार आहे. महायुतीमधील वाटाघाटी दिल्लीमध्ये ठरणार आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार, कुणाला कोणती मंत्रिपदे मिळू शकतात, याची माहिती समोर आली आहे.
गृह, अर्थ अन् नगरविकास कुणाकडे, मलाईदार खाती कोण घेणार?
मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाणार, हे निश्चित झालेय. पण महत्त्वाची खाती कोण घेणार? कुणाच्या पदरी मलाईदार खाती येणार? याचं उत्तर ७२ तासांत मिळेलच. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाला सर्वाधिक मंत्रिपदे मिळणार आहेत. भाजप गृहमंत्रालय आपल्याकडेच ठेवणार आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रावादीकडे तिजोरीच्या चाव्या, म्हणजेच अर्थ खाते जाणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते राहण्याची शक्यता आहे.
पाहूयात कुणाकडे कोणती खाती राहू शकतात, संभाव्य यादी
भाजपकडे कोणती खाती?
मुख्यमंत्री
गृहमंत्री
सामाजिक बांधकाम
जलसंपदा
वैदकीय
वने
आरोग्य
उच्चशिक्षण
उर्जा
सहकार
शिवसेनेला कोणती खाती जाणार? -
नगरविकास
एमएसआरडीसी
पाणीपुरवठा
उदयोग
आदिवासी
अजित पवारांकडे कोणती खाती?
अर्थमंत्रालय
महसूल
कृषी
ग्रामविकास
महिला बालविकास
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.