restoration works begins in vitthal rukmini mandir pandharpur saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Vitthal Mandir: विठ्ठल रूक्मिणी मंदिर संवर्धनाच्या कामास प्रारंभ, 150 कोटींचा निधी मंजूर

या कामासाठी उत्तर प्रदेशातून सुमारे 200 प्रशिक्षीत कामगार दाखल झाले आहेत.

भारत नागणे

Pandharpur News :

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिर‌‌‌ संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या कामासाठी राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात 150 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे हे काम आता वेगाने आणि वेळेत पूर्ण होणार आहे. या कामाला आता प्रत्यक्ष सुरवात झाली आहे. (Maharashtra News)

विठ्ठल मंदिराचे संवर्धन करण्याचा कामासाठी राज्य सरकारने 73 कोटी रूपये मंजूर केले आहेत. हा निधी अपुरा असल्याने तो आता 150 कोटी इतका केला आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी 43 कोटींचा निधी मिळाला असून कार्तिकी यात्रेला (kartki yatra) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

या कामासाठी उत्तर प्रदेशातून सुमारे 200 प्रशिक्षीत कामगार दाखल झाले आहेत. मंदिराच्या दगडांना मुळ रूप देण्यात येणार आहे. मंदिरातील अंतर्गत दुरूस्ती बरोबरच, मंदिरात नवीन इलेक्ट्रिकची सर्व कामे केली जाणार आहेत. अंतर्गत झालेली पडझड दुरूस्त केली जाणार आहे. एक वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे अशी माहिती विठ्ठल मंदिरातून देण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Lifestyle : मायक्रोवेव्ह की ओव्हन, जेवण कशामध्ये शिजवता? आरोग्यासाठी काय योग्य? जाणून घ्या

दिवाळीआधी 'गुड न्यूज'! दारूपासून कीवी आणि सफरचंद होणार स्वस्त; एका कराराने भारताला मोठा दिलासा

Maharashtra News Live Update: अर्धा तासाचा पावसामध्ये भिवंडी शहरात अनेक ठिकाणी साचले पाणी

CSK head coach : धोनीच्या चेन्नईचा हेड कोच बदलला, महाराष्ट्रातील स्टारकडे जबाबदारी

Walk According to Age: २० ते ६० वयानुसार रोज किती चालावं? जाणून घ्या आरोग्यासाठी योग्य चालण्याचं प्रमाण

SCROLL FOR NEXT