raj and uddhav thackeray x
महाराष्ट्र

Maharashtra : हिंदी भाषा जीआर रद्द ही आनंदाची वार्ता ठरली, पण मराठी माणसांच्या मनातील 'ती' इच्छा अपूर्ण राहिली

Maharashtra Politics : महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेशी संबंधित जीआर रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर लगेचच संजय राऊत यांनी ५ जुलैचा मोर्चा रद्द झाल्याची माहिती दिली.

Yash Shirke

Hindi Language Row : राज्य सरकारने त्रिभाषा धोरण जाहीर केले होते. या धोरणामध्ये हिंदी ही भाषा इयत्ता पहिलीपासून शिकवण्याची सक्ती करणार असल्याचे म्हटले होते. हिंदी भाषेच्या सक्तीवरुन राज्यभरात राजकारण तापले. सर्वसामान्य नागरिकांपासून अनेक राज ठाकरे, उद्धव ठाकरे अशा नेत्यांनी सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त केला होता.

हिंदी भाषेच्या सक्तीच्या धोरणाच्या विरोधात ६ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्याबाबतची घोषणा मनसे पक्षाकडून करण्यात आली होती. त्यानंतर मोर्चाची तारीख बदलून ५ जुलै अशी करण्यात आली. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने देखील या मोर्च्याला पाठिंबा दाखवला. ६ जुले रोजी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष शासनाच्या निर्णयाविरोधात एकत्र येणार होते.

५ जुलैच्या मोर्चाआधी महायुती सरकारद्वारे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. 'हिंदी सक्तीबाबतचा शासन निर्णय रद्द केला जाणार आहे. यासंदर्भातील दोन्ही जीआर सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढील निर्णयासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाणार असून, त्या समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढील पावले उचलली जातील. हिंदी भाषा ऐच्छिक असेल, तर मराठी भाषा राज्यातील शाळांमध्ये अनिवार्य राहील', असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

हिंदी भाषेशी संंबंधित धोरण रद्द केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी संजय राऊत यांनी ५ जुलैचा मोर्चा रद्द झाल्याची माहिती ट्वीट करुन दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी विजयी सभा होणार असल्याची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होणार की नाही यावर उद्धव ठाकरे यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. दोन्ही जीआर रद्द झाल्याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंना एकत्र मोर्चात पाहण्याची महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा अपूर्ण राहणार असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT