Ahmednagar District Renamed To Ahilyanagar Wikipedia
महाराष्ट्र

Ahmednagar Renamed As Ahilyanagar: अहमदनगर नव्हे, आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Ahmednagar District Renamed To Ahilyanagar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या नामकरणाची करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. अहमदनगर जिल्ह्याची ओळख पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर,अशी असणार आहे.

Bharat Jadhav

Ahmednaga To Ahilyanagar:

अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा घेण्यात आलाय. नगर शहराचे नाव आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक व संघटनांनी केली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत पुण्यातील वेल्हे तालुक्याचे नाव बदलण्यात आले आहे. आता हा तालुका ‘राजगड’म्हणून ओळखला जाणार आहे.

(Latest News)

या संदर्भात विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून माहिती मागविण्यात येऊन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाचा ठराव देखील राज्य शासनास प्राप्त झाला होता. या अनुषंगाने गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस करण्यात आली. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची कार्यवाही महसूल आणि नगरविकास विभागाकडून करण्यात येईल.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार

मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव लालबाग रेल्वे स्थानक, सॅन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक, मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचे नाव मुंबादेवी रेल्वे स्थानक, चर्नी रोड रेल्वे स्थानकाचे नाव गिरगाव रेल्वे स्थानक, कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचे नाव काळाचौकी रेल्वे स्थानक, हार्बरवरील सॅन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक, डॉकीयार्ड रेल्वे स्थानकाचे नाव माझगाव रेल्वे स्थानक, किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक असे करण्यास मान्यता देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शहापूर बसचा भीषण अपघात, 8 ते 10 प्रवासी जखमी

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

SCROLL FOR NEXT