Ahmednagar To Be Renamed: अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलणार; 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' नावासाठी महापालिकेत ठराव मंजूर

Ahmednagar To Be Renamed: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या २९८ व्या जयंती सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याविषयी मोठी घोषणा केली होती. आता नवीन ठेवण्यासंदर्भात अहमदनगर महानगरपालिकेत ठराव मंजूर करण्यात आलाय.
Ahmednagar To be Renamed As Punyashlok Ahilya Devi Nagar | Saam Tv Marathi News
Ahmednagar To be Renamed As Punyashlok Ahilya Devi Nagar | Saam Tv Marathi NewsSaam Tv
Published On

(सुशील थोरात, अहमदनगर)

Ahmednagar District Name Change Now as Punyashlok Ahilya Devi Nagar:

अहमदनगर संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यात आले आहे. आता या जिल्ह्याला "पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर" नाव देण्यात आलंय. जिल्ह्याचे नाव बदलण्याचा ठराव महापालिकत मंजूर करण्यात आलाय. अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महापालिकेला बहुमत ठरावाची मागणी करण्यात आली होती.(Latest News)

Ahmednagar To be Renamed As Punyashlok Ahilya Devi Nagar | Saam Tv Marathi News
WiFi चा Password विसरलात? टेन्शन नॉट! फोनमधली ही सेटिंग लगेच ऑन करा

चौंडी येथे मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी "पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर" झाल्याची केली होती घोषणा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या २९८ व्या जयंती सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती. महापालिकेसह रेल्वे प्रशासन आणि पोस्ट ऑफिस यांचेही ना हरकत प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाच्या नगर विकासखात्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मे महिन्यात आहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव बदलण्याची घोषणा केली होती. अहमदनगरचं नाव बदलून आहिल्यादेवी होळकर नगर असं केलं जाणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याचं सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले होते.

Ahmednagar To be Renamed As Punyashlok Ahilya Devi Nagar | Saam Tv Marathi News
Sings Of Heart Problem : व्यायाम केल्यानंतर शरीरात ही लक्षणे दिसल्यास वेळीच व्हा सावध! येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com