Government Decision Saam Tv
महाराष्ट्र

Government Decision: फक्त ५०० रूपयांत वडिलोपार्जित जमीन नावावर, सरकारने घेतला मोठा निर्णय

Ancestral Land Distribution on 500rs Stamp Paper: आता वडिलोपार्जित जमीन फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्पद्वारे मुलांच्या नावावर केली जाणार आहे. याआधी तुम्हाला रजिस्ट्रेशन फी आणि स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती.

Siddhi Hande

राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

आता वडिलोपार्जित जमीन फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्पद्वारे होणार नावावर

लवकरच शासन निर्णय होणार जारी

राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आता वडिलोपार्जित जमीन अवघ्या ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर मुलांच्या नावावर होणार आहे. वडिलोपार्जित जमीन मुला-मुलींच्या नावावर वाटणी या स्टॅम्प पेपरद्वारे होण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. यासंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केलेली आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ८५ नुसार संयुक्त धारणेतील जमिनीत एकापेक्षा जास्त सहधारक असतील तर त्याच्या वाटणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येतो. मात्र, मालकी हक्काबाबत वाद असल्यास दिवाणी न्यायलयात जावे लागते. त्या निकालाची वाट पाहावी लागते. यानंतर एकदा आदेश आल्यानंतर वाटणीची कार्यवाही तहसीलदारांमार्फत केली जाते. यासाठी एकही रुपया शुल्क आकारले जात नाही.

याशिवाय वडिलांच्या संमतीने त्यांच्या मुलांच्या नावावर जमीन किंवा जागेची वाटणी देत असतील तर त्यासाठी १-२ टक्के स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन शुल्क आणि २०० किंवा ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर लागतो. परंतु आता महसूल विभागाच्या नवीन प्रस्तावित निर्णय लागू झाला तर कोणतेही शुल्क न भरता फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर वडिलोपार्जित जमिनीचे हिस्से मुलांच्या नावावर करता येणार आहे. सर्वांची संमती झाल्यानंतर केलेला स्टॅम्प दुय्यम निबंधक कार्यालयात दिला जाईल. यानंतर संबंधित मुलांच्या नावावर तेवढे क्षेत्र केले जाईल, अशी पद्धत असणार आहे.

याआधीची जमीन नावावर करण्याची पद्धत

सध्या तुम्हाला वडिलांची जमीन मुलांच्या नावावर करण्यासाठी वाटणीपत्र किंवा बक्षीसपत्राची गरज पडते. यासाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही. मात्र,वडिलांच्या जमीन वाटणीसाठी एक ते तीन हजार रुपयांची रजिस्ट्रेशन फी आणि ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते. जमिनीचा हिस्सा मुलीच्या किंवा बहिणीच्या नावावर करायचा असेल तर त्यासाठी १ टक्का स्टॅम्प ड्युटी आणि २०० रुपयांचा स्टॅम्प लागतो. दरम्यान, आता या नवीन शासन निर्णयानुसार तुम्ही कोणत्याही रजिस्ट्रेशन चार्जशिवाय फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरद्वारे तुम्हाला जमीन नावावर करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone : चाहत्याच्या आईने पुरणपोळी आणली अन् दीपिकाने थेट...; VIDEO मधील साधेपणा पाहून नेटकरी भारावले

Maharashtra Live News Update: आज पुण्यात अजित पवारांचा रोड शो

Nashik Politics: मोठी बातमी! नाशिकमध्ये भाजपला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंनी ३ बडे नेते फोडले

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपये पगार; पात्रता काय? वाचा सविस्तर

Gold Rate Today: सोन्याची किंमतीत वाढ की घसरण? वाचा २२ आणि २४ कॅरेटचा आजचा दर

SCROLL FOR NEXT