Maharashtra Home Guards to be appointed as police vehicle drivers saam tv
महाराष्ट्र

Homeguard Drivers: होमगार्ड्सच्या हाती पोलीस वाहनांचं स्टेरिंग; २,३०० होमगार्डना दिलं जाणार वाहनचालकाचं प्रशिक्षण

Home Guards Driving Training : महाराष्ट्रातील २,३०० प्रशिक्षित होमगार्डना पोलीस वाहनचालकाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १,१५० वाहनचालक होमगार्ड तैनात करण्यास मान्यता देण्यात आले आहे. जाणून घ्या सरकारच्या निर्णयाची संपूर्ण माहिती.

Bharat Jadhav

  • राज्यातील विविध पोलीस घटकांकडून पोलीस वाहनचालकांची गरज असल्याची मागणी

  • प्रशिक्षित होमगार्डना पोलीस वाहनांचे चालक म्हणून नियुक्त करण्यात येणार

  • पहिल्या टप्प्यात १,१५० वाहनचालक होमगार्ड तैनात करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्य सरकारने होमगार्ड संदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील प्रशिक्षित होमगार्डना आता पोलिस वाहनांचे चालक म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. राज्यातील विविध पोलिस घटकांकडून प्राप्त झालेल्या मागणीनुसार पहिल्या टप्प्यात एक हजार १५० वाहनचालक होमगार्ड तैनात करण्यास मान्यता देण्यात आलीय. त्यासाठी एकूण २३०० होमगार्ड्सला ४ आठवड्यांचे वाहनचालक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

गृह विभागाने ३० जून २०२६ रोजी दिलेल्या मान्यतेनंतर पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील विविध पोलिस घटकांकडून आवश्यक वाहनचालक होमगार्डची माहिती मागवली होती. त्यानुसार पोलीस घटकांनी १,९०५ वाहनचालक होमगार्डची आवश्यकता असल्याचे सांगितले.

मात्र प्राप्त मागणीच्या अनुषंगाने महासमादेशक होमगार्ड यांनी पहिल्या टप्प्यात १,१५० होमगार्ड तैनात करण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पोलीस दलातील वाहनचालकांची कमतरता काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रशिक्षित होमगार्डच्या कौशल्याचा पोलिसांच्या दैनंदिन कामकाजासाठी उपयोग केला जाणार आहे.

पहिल्या टप्प्यातील १,१५० होमगार्डना सहा महिन्यांसाठी तैनात करण्यात येणार आहे. त्यानंतर सहा महिन्यांचा खंड देऊन दुसऱ्या टप्प्यात उर्वरित १,१५० प्रशिक्षित होमगार्डना पुढील सहा महिन्यांसाठी संधी दिली जाईल. अशाप्रकारे एका वर्षात दोन टप्प्यांत एकूण २,३०० प्रशिक्षित होमगार्डना वाहनचालक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.

पोलीस दलाच्या दैनंदिन कामकाजात रात्रीची गस्त, बंदोबस्त, तपास, आरोपींची ने-आण, घटनास्थळी तातडीने पोहोचणे, बिट मार्शल, व्हीआयपी बंदोबस्त, तसेच डायल ११२ यांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी वाहनचालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. दरम्यान सरकारच्या या नव्या निर्णयानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात डायल ११२ वाहनांसह पोलीस वाहनांवर १०० प्रशिक्षित होमगार्डची नियुक्ती होणार आहे. या निर्णयानंतर जिल्हा पोलिस दलाला प्रशिक्षित मनुष्यबळ मिळण्याबरोबरच होमगार्ड जवानांनाही कौशल्याच्या जोरावर नवीन संधी उपलब्ध होतील.

सरकारने घेतलेल्या या निर्णयावर माजी समादेशक अधिकारी, नेवासे बाळासाहेब देवखिळे म्हणाले की, शासनाच्या या निर्णयामुळे होमगार्ड विभागात नवचैतन्य निर्माण झाले आहे. अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक वैभव कलबुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १०० होमगार्ड जवान डायल ११२ वाहनचालक म्हणून आपली जबाबदारी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोदींच्या कार्यालयातून मला माहिती मिळते; चीनचा उल्लेख करत राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra News Live Update: कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या संतापाचा उद्रेक; शिंदे-फडणवीसांचं नाव घेत दिला निर्वाणीचा इशारा

माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला करणारा कोण? पहिला व्हिडिओ आला समोर; फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

Chandrashekhar Bawankule: माझी बायको पण कुणबी, माझ्या व्यंगावर बोलून...; जरांगेंच्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे भावुक

SCROLL FOR NEXT