Police Recruitment 2025 Saam Tv
महाराष्ट्र

Police Recruitment: आनंदाची बातमी! १५,६३१ पदांच्या पोलिस भरतीचा शासन निर्णय जारी, परीक्षा शुल्क किती?

Police Recruitment 2025: पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. १५,६३१ पदांच्या पोलिस भरतीबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. कोणत्या पदासाठी किती जागा आणि किती शुल्क असणार आहे? हे घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • महाराष्ट्र सरकारने १५,६३१ पोलिस भरती पदांना मंजुरी दिली.

  • पोलिस शिपाई, चालक, बॅण्डस्मन, सशस्त्र शिपाई आणि कारागृह शिपाई पदं भरण्यात येणार.

  • खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क ४५० रुपये, मागास प्रवर्गासाठी ३५० रुपये.

  • शासन निर्णय जारी, भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार.

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाकडून १६,६३१ पदांच्या पोलिस शिपाई भरतीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्यातील पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई भरतीला हिरवा कंदील देण्यात आला आहे. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान रिक्त झालेली पदे १०० टक्के भरण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. ही सर्व १५,६३१ पदं भरली जाणार आहेत.

१२ ऑगस्टला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये १५,६३१ पदांची पोलिस भरती करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर आज गृह विभागाकडून याबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राज्यातील पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती लवकरच होणार आहे. शासनाने जारी केलेल्या निर्णयाद्वारे कोण-कोणती आणि किती पदांसाठी भरती केली जाणार आहे आणि त्यासाठी किती शुल्क लागणार आहे याची माहिती देण्यात आली आहे.

रिक्त पदांची संख्या किती?

एकूण पदं - १५,६३१ पदं

पोलिस शिपाई - १२,३९९ पदं

पोलिस शिपाई चालक -२३४ पदं

बॅण्डस्मन - २५ पदं

सशस्त्र पोलिस शिपाई - २३९३ पदं

कारागृह शिपाई - ५८० पदं

या पोलिस भरती प्रकियेसाठी या पूर्वीच्या पोलिस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता ४५० रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रुपये इतके परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. तसंच परीक्षा शुल्क स्वरुपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरीता खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT