
तरुणांना सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी मिळणार आहे. राज्याच्या गृह विभागात सध्या पोलिसांची १३ हजार ५६० पदे रिक्त आहेत. या पदांसाठी आता भरती जाहीर करण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर पदभरतीला सुरुवात होणार आहे. आता तुमचे पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.(Police Bharti)
राज्यात होणार पोलिस भरती
सध्या रिक्त पदांची बिंदुनामावली पडताळणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राज्याच्या प्रशिक्षण आणि खास पथकेच्या अपर पोलिस महासंचालकांनी रिक्त पदांची माहिती गृह विभागाला कळविली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजण्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये पदभरतीला सुरुवात होईल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
अनेकांचे पोलिस होण्याचे स्वप्न असते. त्यासाठी अनेक तरुण खूप मेहनत घेतात.पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. आता लवकरच भरतीप्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पोलिस भरतीत मैदानी चाचणी होती. दरम्यान, सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात मैदानी चाचणी घेणे शक्य नाही.
पावसाळ्यात मैदानी चाचणी होणार नसल्याने आता गणेशोत्सवानंतरच ही भरती केली जाणार आहे. गणेशोत्सवात राज्यभर पोलिस अधिकाऱ्यांची ड्यूटी असते. त्यामुळे ही भरती प्रक्रिया करणे शक्य नाही. यामुळेच सप्टेंबरअखेर उमेदवारांकडून अर्ज मागवले जातील. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात खऱ्या अर्थाने भरतीला सुरवात होईल.
राज्यात तब्बल दहा हजार १८४ पोलिसांची पदे रिक्त आहे.यामध्ये बँडसमन, राज्य राखीव पोलिस बल अशी दीड हजार पदे रिक्त आहेत. यानंतर प्रशिक्षण व खास पथकांसाठी रिक्त पदांची माहिती गृह विभागाला दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.