maharashtra government examination fee waiver scheme  AI Image
महाराष्ट्र

Maharashtra : विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! २०२६-२७ मध्ये परीक्षा शुल्क माफ; सरकारकडून नवे नियम जाहीर

Maharashtra Farmer Drought News : महाराष्ट्र सरकारचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त भागातील पात्र विद्यार्थ्यांचे २०२६-२७ शैक्षणिक वर्षातील परीक्षा शुल्क माफ होणार.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्र सरकारचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय!

  • दुष्काळग्रस्त भागातील पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार.

  • सरकारकडून नियम आणि अटी जारी

राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांतील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या निर्णयासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परीक्षा शुल्क माफीसाठी काही नियम आणि अटी जाहीर केल्या आहेत. मात्र, या सवलतीचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांना शासनाने ठरवलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील नियमित विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मात्र, बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या शुल्कमाफीचा फायदा मिळणार नाही. तसेच एखाद्या विषयाची किंवा त्याच परीक्षेची पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ही सवलत लागू असणार नाही.

याशिवाय, शहरात नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या पाल्यांना केवळ त्यांच्या कुटुंबाची गावात शेती आहे म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे शुल्कमाफी देताना विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची परिस्थिती आणि शासनाने निश्चित केलेल्या निकषांचा विचार केला जाणार आहे. महाडीबीटी योजनेंतर्गत यापूर्वीच ५० टक्के परीक्षा शुल्कमाफी मिळालेल्या विद्यार्थ्यांना उर्वरित ५० टक्के शुल्कही माफ केले जाणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना संपूर्ण परीक्षा शुल्कातून सूट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सरकारच्या या निर्णयासाठी सुमारे २० लाख ३८ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यामुळे परीक्षा शुल्काचा आर्थिक भार कमी होऊन विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अमरावतीत हृदयद्रावक घटना,९ वर्षीय शिवांश नदीत बुडाला

Dangerous Fort : डोंगरात कोरलेल्या पायऱ्या, खोल दऱ्या अन् २२५० फूट उंचीचा अद्भुत सुळका; मुंबई-पुण्याजवळ वसलाय खतरनाक ट्रेकिंग स्पॉट

Ramayana : 'रामायण'चा तिसरा भागही येणार? रणबीर कपूरच्या 'त्या' वक्तव्याने चर्चांना उधाण | VIDEO

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; सुरुवातीच्या निकालांत रिपब्लिकन पक्षाची पिछेहाट

भारताने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, ४ घातक वेगवान गोलंदाजांना संधी, कुलदीप-सिराज बेंचवरच, पाहा प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT