rajiv gandhi 
महाराष्ट्र

राजीव गांधींच्या नावाने महाराष्ट्रात दिला जाणार हा पुरस्कार

Siddharth Latkar

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात (आयटी) उत्कृष्ट कार्य करणा-या कंपन्या आणि संस्थांना राजीव गांधी rajiv gandhi यांच्या नावाने पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. त्याबाबतची घोषणा माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील satej patil यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. प्रतिवर्षी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त २० ऑगस्टला आयटी IT award पुरस्कार वितरण समारंभ केला जाईल अशी ग्वाही मंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.

राज्यातील आयटी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकाराने दिवंगत राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगताना मला फार अभिमान वाटत असल्याचे मंत्री पाटील यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

हा पुरस्कार तंत्रज्ञान क्षेत्रातील राजीव गांधी यांच्या योगदानास श्रद्धांजली असेल असा दावा मंत्री पाटील यांनी केला आहे. हा पुरस्कार स्वर्गीय राजीव जी यांना भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कार्यासाठी कायमस्वरूपी श्रद्धांजली ठरेल असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

भारताला स्वयंपुर्ण व स्वावलंबी बनविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणाची जोड राजीव गांधींनी दिली. भारताची एकात्मता व अखंडतेसाठी बलिदान देणारे दिवंगत काँग्रेस नेते राजीव गांधी हे विज्ञान व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक मानले जातात. हा निर्णय याेग्य असल्याची भावना मंत्री पाटील यांच्या घाेषणेनंतर अनेकांनी त्यांच्या ट्विटला प्रतिसाद देत म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच दिवसांपुर्वीच राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार केले. देशभरातील नागरिकांच्या मागणीनूसार, विनंतीनुसार खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलत असल्याचे पंतप्रधान माेदींनी त्यावेळी नमूद केले. भारतीय हॉकीच्या दिग्गज खेळाडूाच्या नावाने पुरस्कार करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेस पंतप्रधान मोदींचा खेलरत्न पुरस्काराच्या नामांतरचा निर्णय खटकला. त्याबाबत सेनेने सोमवारी (ता. ९) आपल्या मुखपत्र सामनामध्ये असा दावा केला आहे की, राजीव गांधींचे नाव बदलण्याचा केंद्राचा निर्णय हा लोकांचा हक्क नसून एक 'राजकीय खेळ' आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT