CM Devendra Fadnavis News  AI Image
महाराष्ट्र

Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय! सर्व विभागांच्या खर्चात २० टक्के कपातीचे निर्देश

CM Devendra Fadnavis On Maharashtra Drought : महाराष्ट्र सरकारकडून खर्चकपातीचे धोरण जाहीर. रस्ते आणि सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळण्याच्या सूचना, तर दुष्काळ निवारणासाठी पाणीपुरवठा, जलसंधारण आणि चारा योजनांना प्राधान्य.

Alisha Khedekar

राज्यात दुष्काळाचे संकट आणि राज्याच्या तिजोरीवरील वाढता आर्थिक ताण लक्षात घेता, राज्य सरकारने खर्चकपातीच्या हालचालींना वेग दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना काटकसरीचे धोरण स्वीकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, सर्व विभागांच्या निधी खर्चात २० टक्के कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रस्ते आणि सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळण्यावर सरकारने भर दिला आहे. मात्र, शिक्षण, आरोग्य, कर्जमुक्ती आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांसारख्या महत्त्वाच्या योजनांच्या निधीत कपात न करण्याची सूचना देण्यात आली आहे. दुसरीकडे, दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलसंधारण, पाणीपुरवठा आणि चारा योजनांसाठी निधीचा योग्य वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जागतिक अस्थिरता, आर्थिक मंदी आणि दुष्काळी संकटाच्या पार्श्वभूमीवर विभागप्रमुखांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, तसेच सचिवांनी सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत पावसाची दमदार हजेरी

Kitchen Tips : ॲल्युमिनियमची काळी कढई पुन्हा चमकेल नव्यासारखी! वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

Weather Update : पुढील १२ तासात ९ राज्यात कोसळणार धो-धो पाऊस, ८० किमीच्या वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा

Black Paper Benefits For Pitta: अंगावर पित्त उठण्याच्या समस्येवर घरगुती उपाय, काळी मिरी आणि खडीसाखरेचे करा सेवन

Gulgule Recipe : दसऱ्याला गोडाचा बेत ठरला नाही? लाल भोपळ्याचे गुलगुले एकदा नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT