'No stock' signs at petrol pumps; Citizens fear fuel shortage saam tv
महाराष्ट्र

राज्यात भीषण तेल संकट! कोणकोणत्या जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची रेशनिंग

Petrol-Diesel Rationing On Pumps: राज्यात पेट्रोल पंपावर लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलीय. त्यामुळे प्रशासनानं टंचाईच्या भीतीनं चक्कं पेट्रोल आणि डिझेलची रेशनिंग सुरु केलीय. मात्र ही रेशनिंग कुठल्या जिल्ह्यात सुरु झालीय.पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’ फलकांमुळे नागरिकांमध्ये भीती

  • सरकारने टंचाई नसल्याचं दिलं स्पष्टीकरण

  • काळाबाजार आणि साठेबाजीची शक्यता वाढली.

अमेरिका इराण युद्धाची झळ आता थेट महाराष्ट्रातील नागरिकांना बसायला लागलीय. तेलाचं संकट भीषण रुप घ्यायला लागलंय. सरकार देशात तेल संकट नसल्याचं सांगत असलं तरी पेट्रोल पंपावर लागलेले नो स्टॉकचे बॅनर लागलेत. एवढंच नाही तर ट्राफिक जॅम झाल्याप्रमाणे पेट्रोल पंपावर झालेली गर्दी तेल संकट गहिरं होत असल्याचं चित्र दाखवतेय.

आता पेट्रोल पंपावर गर्दी व्हायला लागल्यानं हिंगोली जिल्हा प्रशासनानं थेट पेट्रोल आणि डिझेल देण्यावर मर्यादा टाकल्या आहेत. दुचाकीला 200 रुपयांचं तर तीन आणि चारचाकीला 2 हजार रुपयांचंच पेट्रोल देण्याचा निर्णय हिंगोलीच्या प्रशासनाने घेतलाय. तर जालन्याच्या पुरवठा विभागानंही दुचाकीला 200 तर चारचाकीला 2 हजार रुपयांचंच पेट्रोल देण्याची नियमावली जारी केलीय.

हे फक्त हिंगोली आणि जालन्यापुरतंच मर्यादित नाही.. तर कोल्हापूरमध्येही पेट्रोल पंप चालकांनी दुचाकीला 200 रुपयांचं तर तीन चाकी आणि चारचाकी गाड्यांना 1 हजार रुपयांचंच पेट्रोल देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा आहे.. मात्र नागरिक पॅनिक होऊन गर्दी करत असल्यानं मागणी आणि पुरवठ्याचं गणित बिघडत असल्याचं म्हटलंय.

सरकार राज्यात टंचाई नसल्याचं सांगत असलं तरी अनेक पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे पोस्टर लागल्यानं जनतेत भीतीचं वातावरण निर्माण झालंय. एवढंच नाही तर याच टंचाईच्या काळात काळाबाजार करणारे दलाल सक्रीय होतात. त्यामुळे साठेबाजी रोखण्यासाठी आणि टंचाईच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू राजेंद्र गडगेच्या आश्रमाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून झाडाझडती

Shocking : रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला गेला, सासऱ्यांनी नकार दिला; रागात जावयाने सासरवाडी पेटवली

सिंधुदुर्गातील समुद्रात मोठी दुर्घटना; वादळाच्या तडाख्यात नौका बुडाली

Young adults lifestyle: शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या तरूणांना या आजाराचा धोका; संशोधनातून धक्कादायक बाब समोर

EPFO Update: EPFO कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ६० वर्षानंतर PFच्या नियमात मोठे बदल

SCROLL FOR NEXT