Maharashtra high level committee for government recruitment exams saam tv
महाराष्ट्र

पेपरफुटीच्या घटनांनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; भरती प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना

Government Recruitment: पेपरफुटी आणि भरती परीक्षांतील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. परीक्षा पद्धतीचा सर्वंकष आढावा घेऊन पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी सूचना घेतल्या जाणार आहेत.

Bharat Jadhav

  • सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

  • विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष आढावा घेऊन गैरप्रकार रोखण्यासाठी सुधारणा सुचवण्यात येणार

  • विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक आणि शिक्षकांकडून थेट सूचना व अभिप्राय घेतला जाणार आहे.

राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारनं कार्यवाही सुरू केलीय. परीक्षेतील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी सरकारच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलीय. यामध्ये राज्याच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

समितीच्या कार्यकक्षेनुसार राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी तसेच अन्य संबंधित घटकांशी चर्चा करत परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी सूचना व अभिप्राय घेण्यात येतील. त्याआधारे समितीचे अध्यक्ष व सदस्य शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे भेट देणार आहेत. त्यावेळी विद्यार्थी व परीक्षार्थींशी संवाद साधून त्यांच्या सूचना व अभिप्राय जाणून घेण्यात येणार आहेत.

देशभक्तीपर प्रवास पूर्ण करून आचरेकर आणि त्यांचे सहकारी रायडर्स शनिवारी डोंबिवलीत परतले. सीमेवर तिरंगा फडकवून आणि सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरे करून सुरू झालेला हा प्रवास डोंबिवलीतील दहीहंडी उत्सवातील सहभागाने संपन्न झाला.

या उपक्रमाद्वारे राष्ट्रध्वजाचा आदर आणि सशस्त्र दलांबद्दलची कृतज्ञता ही भावना देशाच्या सीमांवरून डोंबिवलीपर्यंत पोहोचवली गेली असून, यामुळे स्थानिक रहिवाशांसाठी प्रेरणा आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील नागरिक व संबंधित घटकांना आपल्या सूचना, शिफारशी, हरकती व निवेदने सादर करता येतील. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आलाय. हा कक्ष सोमवार, दि. ७ सप्टेंबर ते गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे.

सूचना व अभिप्राय सादर करण्याचा तपशील

नोडल अधिकारी : निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

प्रत्यक्ष सादरीकरणाचे ठिकाण : करमणूक कर शाखा, ‘बी’ विंग, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

ई-मेल : examcollectorpune@gmail.com

कालावधी : दि. ७ ते १० सप्टेंबर २०२६, सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत.

ज्या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसेल, त्यांनी विहित मुदतीत आपले लेखी अभिप्राय वरील ई-मेलवर पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कर्मचारी भरती पद्धतीत सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापन करण्यात आलीय. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil : एक लाजरा न्‌ साजरा मुखडा...; गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात सुंदर लूक, फोटो तुम्हीही पाहाल तर...

Maharashtra News Live Update: विमान प्रवासाच्या मनमानी विमान तिकीट दरांना लगाम लागणार

Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ

Monsoon Update : वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस! १३ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

SCROLL FOR NEXT