देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे अभिनंदन
अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन
आम्ही गद्दार नाही, मला सत्तेची लालसा नाही, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट
५० आमदारांचा अभिमान - एकनाथ शिंदे
शहीद झालो तरी चालेल माघार नाही - मुख्यमंत्री
'माझे खच्चीकरण करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले'
गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. आम्ही बंड केले नाही, तर उठाव केला, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.
भाजपचे विधानसभेतील सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. हनुमान चालीसा म्हटली म्हणून तुम्ही काहींना तुरुंगात टाकलं, असं मुनगुंटीवार म्हणाले. विरोधकांमधील काही नेते मध्यरात्री भेटतात, असं सांगून त्यांनी गुगली टाकली. एक दिवसही सत्तेवाचून राहू शकत नाही का? असा सवालही त्यांनी केला.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार बॅटिंग केली. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर टीका केली असतानाच, अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. अजित पवार म्हणाले, तुमचा जोश मी पाहिला आहे, तुमचं भाषण सगळे शांतपणे ऐकत असायचे. आज तुम्ही एकनाथ शिंदे कसे योग्य आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस सगळ्यात नशिबवान आहेत. यावेळी अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते पण झाले, उपमुख्यमंत्री सुद्धा झाले, त्यामुळे ते नशिबवान आहेत. त्यांनी सर्व महत्वाच्या पदांवर या अडीच वर्षांत काम केले, असा टोला पवार यांनी लगावला.
अभिनंदन प्रस्ताव मांडताना उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. यावेळी फडणवीसांनी विरोधकांनाही चांगलचं धारेवर घेतलं. "माझी टिंगल-टवाळी केली पण मी पुन्हा आलो आणि एकटा आलो नाही तर यांना घेऊन आलो" असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. (Maharashtra Politics News)
शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठरावात १६४ मते मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे, तर महाविकास आघाडीला ९९ मते मिळाली आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारने १४४ बहुमतांचा आकडा गाठत १६४ मते मिळवली आहेत.
पहिल्या कसोटीत शिंदे-फडणवीस सरकारने बाजी मारील. आज दुसऱ्या दिवशी या सरकारसाठी दुसरी कसोटी आहे. विधानसभेत बहुमत चाचणीला सुरुवात झाली आहे.
शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. आमदार संतोष बांगर आता एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आता शिंदे गटाचे संख्याबळ वाढले आहे.
काल विधान भवनातील शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय बंद ठावण्यात आले होते. आज हे कार्यालय उघडण्यात आले आहे. आमदार अजय चौधरी कार्यालयात उपस्थित आहेत. ओळखपत्र पाहिल्याशिवाय कार्यालयात प्रवेश दिला जात नाही. एकनाथ शिंदे गटाचे आमदार या कार्यालयाचा ताबा घेऊ नये म्हणनू शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे.
मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांची वर्णी लागल्यावर शिंदे गटाकडून शिवसेनेत अजून खिंडार पडू नये याची विशेष काळजी उद्धव ठाकरे घेत आहेत. जिल्हाप्रमुखांची भूमिका जाणून घेत पक्षातील अंतर्गत घडामोडीचा एक अंदाज उद्धव ठाकरे आजच्या बैठकीत घेणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा प्रमुखांना काही विशेष सूचना करत कार्यक्रम दिले जाणार असल्याची माहिती आहे.
- आजच्या विश्वासदर्शक ठरावात एम आय एम आणि समाजवादी पार्टी तटस्थ राहण्याची शक्यता.
- विश्वासदर्शक ठरावात आजही महाविकास आघाडीचे सदस्य अनुपस्थित राहण्याची शक्यता.
- एकनाथ शिंदे गटाला मान्यता मिळाल्यानंतर महाविकास आघाडीकडून आक्षेप नोंदविला जाणार.
पहिल्या कसोटीत शिंदे-फडणवीस सरकारने बाजी मारील. आज दुसऱ्या दिवशी या सरकारसाठी दुसरी कसोटी असणार आहे. आज विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. शिंदे-फडणवीस सरकारला आज विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे नव्या सरकारची आज दुसरी कसोटी असणार आहे. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु होणार आहे. त्यानंतर आवाजी मतदानानं बहुमत चाचणी होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.