Maharashtra Flood: 2 लाख 29 हजार लोक सुरक्षित स्थळी, 149 जणांचा मृत्यू
Maharashtra Flood: 2 लाख 29 हजार लोक सुरक्षित स्थळी, 149 जणांचा मृत्यू Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Flood: 2 लाख 29 हजार लोक सुरक्षित स्थळी, 149 जणांचा मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : अतिवृष्टी आणि पुरामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरीबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा Flood मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. भूस्खलन तसेच दरडी मलबा कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या चार दिवसांत जवळपास २ लाख २९ हजार ७४ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार १४९ जणांचा मृत्यू तर ६४ जण अजूनही बेपत्ता आहेत. अशी माहिती आहे.

कोकण Konkan तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग अजूनही पुरसदृश परिस्थितीत आहे. रस्ता खचणे, दरड कोसळणे यांसारख्या घटना घडणे सुरु आहे. नुकसानग्रस्त ठिकाणी एनडीआरएफ NDRF च्या टीमचे, लष्कराच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. माहितीनुसार ‘एनडीआरएफ’च्या 25 टीम, ‘एसडीआरएफ’च्या 4 टीम, कोस्ट गार्डच्या 2 टीम, नेव्हीच्या 5 टीम, लष्कराच्या 3 टीमचे अडचणीत सापडलेल्या नागरिकांचे बचाव करत आहेत. चिपळूण येथे तात्पुरत्या 5 निवारा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार,

पुरामुळे मृत्यूंची संख्या - १४९
जखमी नागरिकांची संख्या - ५०
बेपत्ता नागरिक- ६४

NDRF आणि मदतीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित नागरिकांची संख्या-

रत्नागिरी - १२००
सिंधुदुर्ग- १२७१
रायगड- १०००
ठाणे- ६९३०
सातारा- ७५३०
कोल्हापूर- ४०८८२
सांगली- १६९९९८
पुणे- २६३

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT