farm roads saam tv
महाराष्ट्र

Farmer News: शेतबांधावर आणता येणार ट्रॅक्टर, शेतबांधाचे वाद मिटणार, महसूल विभागाचा मोठा निर्णय

Revenue Dept's Big Decision: महसूल विभागाच्या एका निर्णयानं आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलास मिळणार आहे. तो निर्णय नेमका काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..

Omkar Sonawane

शेत रस्त्याच्या वादावरून शेतकऱ्यांमध्ये भांडण होण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. पण आता शेतरस्त्यांपर्यंत जाणं सोप्प तर होणारच आहे पण त्याचबरोबर ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर यासारखी वाहनंही आता थेट शेतापर्यंत घेऊन जाता येणार आहेत.याला कारण ठरलाय महसुल विभागानं घेतलेला नवीन निर्णय.यापुढे शेतीच्या बांधावरून जाणारा शेत रस्ता हा 12 फुटांचा असणार आहे.

येत्या 90 दिवसात या शेत रस्त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्याय येणार आहे, शेतीच्या दष्टीनं आवश्यक असणारी ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर यासारखी मोठी कृषी अवजारे आता थेट शेतातून घेऊन जाता येणार आहेत. महसूल विभागानं शेत रस्त्यासंदर्भातील आदेशात काय म्हटलंय पाहूयात.

अधिकाऱ्यांनी पारंपारिक शेतरस्त्यांऐवजी 3 ते 4 मीटर रुंद शेतरस्ते उपलब्ध करुन द्यावेत

शेतकऱ्यानी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करावी

शेतरस्ता उपलब्ध नसेल तिथे आवश्यकतेनुसार 3 ते 4 मीटर पेक्षा कमी पण रुंद रस्ता उपलब्ध करून द्यावा

बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करावी

7/12 उताऱ्याच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद कराव

महसूल विभागाच्या या निर्णयाचं शेतकऱ्यांनीही स्वागतच केलं आहे.मात्र गावखेड्यात भांडण तंटा मिटवून, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णयाची पारदर्शकरित्या अंमलबजावणी व्हावी एवढीच माफक अपेक्षा. .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Heel Side Effects: सतत हिल सॅन्डल्स घातलताय, होऊ शकतात या समस्या

Kala Vatana Usal: पावसाळ्यात बनवा झणझणीत काळ्या वाटाण्याची उसळ, चव वाढवण्यासाठी वापरा 'ही' खास ट्रिक

Maharashtra Live News Update: सलग चौथ्या दिवशी उधाणाचा कोकण किनारपट्टीला फटका

BMC निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी कसली कंबर, ८ शिलेदार निवडले, कोणकोणत्या नेत्याला संधी?

AI in Heart Surgery: सोलापुरात एआयच्या मदतीने एकाच दिवशी तीन अतिजटील हृदय शस्त्रक्रिया यशस्वी|VIDEO

SCROLL FOR NEXT