Maharashtra drought review meeting viral video Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Farmer: शेतकरी दुष्काळाने त्रस्त, कृषिमंत्र्यांसमोर अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

Maharashtra drought review meeting viral video: कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या बैठकीतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कृषिमंत्र्यांसमोर अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले.

Priya More
  • अकोल्यातील दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त

  • कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर अधिकारी मोबाईलमध्ये खेळताना दिसले

  • अकोला दुष्काळ आढावा बैठकीतील अधिकाऱ्यांचा व्हिडीओ समोर

  • दुष्काळी परिस्थितीच्या बैठकीतील व्हिडीओ व्हायरल

मराठवाड्यातील काजू-बदामच्या प्रकारानंतर आता अकोल्यात प्रशासनातील अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. कृषिमंत्र्यांची दुष्काळासंदर्भातील आढावा बैठक सुरू असताना अधिकारी मात्र मोबाईल खेळण्यात दंग असल्याचा प्रकार घडला आहे. कृषिमंत्र्यांसमोर बैठकीला बसून हे सर्व अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलपणावर आता सडकून टीका केली जात आहे.

सध्याच्या राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातील अधिकारी खरोखरच संवेदनशील आहेत का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. शनिवारी हिंगोलीतील दुष्काळाच्या आढावा बैठकीतील काजू-बदामाच्या मुद्द्यानंतर आता अकोल्यात एक संतापजनक प्रकार समोर आला. आज अकोल्यात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोलावलेल्या अमरावती विभागीय आढावा बैठकीत अधिकारी चक्क मोबाईलमध्ये खेळण्यात दंग असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला.

आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ठाकरे सभागृहात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला मंत्री संजय राठोड, आकाश फुंडकर, अशोक उईके, इंद्रनील नाईक यांच्यासह राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ऑनलाइन उपस्थित होत्या. अमरावती विभागातील सर्वपक्षीय खासदार आणि आमदारांनीही बैठकीत सहभाग घेतला.

एकीकडे दुष्काळाच्या मुद्द्यावर लोकप्रतिनिधी पोटतिडकीने बोलत असताना त्याचवेळी अनेक अधिकारी मात्र मोबाईलवर फेसबुक, व्हॉट्सअप पाहण्यात दंग असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या बैठकीत कृषिमंत्र्यांनी दुष्काळ निवारणाच्या संदर्भात प्रशासनाला अनेक सूचना दिल्या. मात्र, प्रशासनाने या सूचना खरंच गांभीर्याने घेतल्यात का? हा प्रश्न यातून निर्माण होत आहे. याप्रकरणी विरोधकांनी या संवेदनशील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तर कृषिमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खासगी बसला ST ची दमदार टक्कर! 200 व्होल्वो बसेस, ऑनलाइन बुकिंग अन् शयनयानाची सुविधा

Maharashtra News Live Update: धुळ्यातील देवपूर प्रभात नगरमध्ये घरफोडी

Skin Care: चेहऱ्यावरचे खडे कमी होऊन स्किन होईल स्मूद आणि ग्लोईंग, घरच्या घरी करा 'हा' सोपा उपाय

Political News: माजी मंत्र्यांची मुलगी निवडणुकीच्या रिंगणात, शिक्षक मंतदार संघ निवडणुकीत मोठी अपडेट

माजी पंतप्रधानांच्या बहिणीला अटक; राजकारणात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT