PUNYASHLOK AHILYABAI HOLKAR FARMER LOAN WAIVER MAY BE DELAYED AGAIN AS MAHARASHTRA AWAITS CENTRAL TAX DATA Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Farmer Loan : राज्य सरकारचा मोठा निर्णय! शेतकरी कर्जमाफी लांबणीवर; आता कधी होणार कर्जमाफी? वाचा

Maharashtra Farmer Loan Waiver Update News : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत पुन्हा विलंब होण्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

  • कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा

  • शेतकरी कर्जमाफी लांबणीवर

  • सरकारने शेतकऱ्यांच्या इन्कम टॅक्स संदर्भातील माहिती केंद्र सरकारकडे मागवली

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील लाखो शेतकरी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी या योजनेच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत असताना कर्जमाफीचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारकडून काही महत्त्वाचा डेटा मिळाल्या नंतरच कर्जमाफीच्या निर्णयाची अंतिम अंमलबाजवणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी वाट पाहावी लागणार आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या इन्कम टॅक्स संदर्भातील माहिती मागवली आहे. ही माहिती मिळण्यासाठी किमान पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत पुढील आठवड्यातही स्पष्ट निर्णय होईल की नाही, याबाबत अनिश्चितता कायम आहे.

दरम्यान, कर्जमाफी योजनेच्या पात्रतेसंदर्भातही महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे. इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यायचा की नाही, यावर सरकारमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. जर इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला, तर राज्यातील मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील अनेक शेतकरी संघटनांनी कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. वारंवार होणारा विलंब आणि पात्रतेसाठी लावण्यात येणाऱ्या नव्या अटी यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असल्याचे चित्र आहे. शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसताना आणि उत्पादन खर्च वाढत असताना कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची मोठी अपेक्षा आहे.दरम्यान ही अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांना सुगीचे दिवस कधी येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : शिवसेनेला खिंडार! एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का, नाराज नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

पालकांनी मुलांसमोर भांडणे योग्य आहे का?

Chatrapati Sambhajinagar: ७ महिन्यांच्या चिमुकल्याने गिळले काचेचे तुकडे; संभाजीनगरमधील धक्कादायक घटना, डॉक्टरांनी असा वाचवला जीव

EPFO Update: PF खात्यावर ८.२५ टक्के व्याज जमा होण्यास सुरूवात, तुम्हाला मिळाले का? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Lock Upp 2: बंदूक घेऊन 'लॉक अप २'मध्ये आला गोविंदा; सुनीता आहुजाला म्हणाला, 'आता माझ्या छातीत गोळी...'

SCROLL FOR NEXT