शेतकरी कर्जमाफी २०२६ नवीन अपडेट
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार पैसे
७ हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
कर्जमाफी पात्र शेतकरी यादी जाहीर
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल १६ लाख ९४ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात येत्या मंगळवारी एकाचवेळी सुमारे ७ हजार कोटी रुपये जमा केले जाणार आहेत. प्राप्तिकर भरणाऱ्या ९४ हजार शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलं असून आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे ही रक्कम जमा होईल.
राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत सहकार विभागाने मोठा निर्णय घेतला. या योजनेतील उर्वरित १६ लाख ९४ हजार पात्र शेतकऱ्यांच्या पैसे दिले जाणार आहेत. ४ ऑगस्ट रोजी म्हणजे मंगळवारी या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाचवेळी ७ हजार कोटी रुपये जमा होणार असल्याची माहिती सहकार विभागामधील सुत्रांनी दिली आहे. पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज खात्यात पैसे जमा होणार असल्यामुळे या शेतकऱ्यांचा पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज्य सरकारने कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांना २ लाखांच्या मर्यादेत कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा करण्यात आली. तर २ लाखांपेक्षा अधिक कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या वाट्याची २ लाखांवरील रक्कम बँकेत भरल्यानंतर एकवेळ समझोता अंतर्गत त्यांच्याही कर्ज खात्यात सरकार २ लाख रुपये जमा करणार आहे.
या योजनेनुसार पहिल्या टप्यामध्ये २ लाखांच्या आतमधील कर्जदार शेतकऱ्यांची यादी सरकारने छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडे पाठविली होती. ९४ हजार शेतकरी अपात्र आढळून आले. त्यांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर या छाननी प्रक्रियेमध्ये उर्वरित १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती सांगितली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.