maharashtra farmer uses rotovator on standing okra crop due to virus SAAM TV
महाराष्ट्र

आधीच दुष्काळ, त्यात भेंडीच्या पिकावर व्हायरसचा विळखा... हवालदिल शेतकऱ्याने दोन एकर उभ्या पिकावर फिरवला रोटावेटर

maharashtra farmer destroys okra crop virus drought : आधीच दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या अहिल्यानगरमधील एका हवालदिल शेतकऱ्याने, भेंडीच्या पिकावर व्हायरसचा विळखा पडल्याने अखेर आपल्या दोन एकर उभ्या पिकावर रोटावेटर फिरवले आहे.

Saam Tv

सचिन बनसोडे, साम प्रतिनिधी

आधीच दुष्काळाचं भीषण संकट,त्यात भेंडी पिकाला व्हायरसचा बसलेला विळखा आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने हवालदिल झालेल्या एका शेतकऱ्याने आपल्या तब्बल दोन एकर भेंडीच्या उभ्या पिकावर रोटावेटर फिरवला आहे. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील विठ्ठल पवार यांनी हा संतापजनक आणि हताश करणारा निर्णय घेतला आहे.

मोठ्या अपेक्षेने आणि कष्टाने विठ्ठल पवार यांनी भेंडीची लागवड केली होती. पीक चांगलं येऊन चार पैसे हातात पडतील, अशी त्यांना आशा होती. मात्र, काही दिवसांतच भेंडीच्या पिकावर व्हायरसचा गंभीर प्रादुर्भाव झाला. डोळ्यांदेखत उभं पीक खराब होऊ लागल्याने बळीराजा हवालदिल झाला. विशेष म्हणजे, सोशल मीडियावरील रील पाहून त्यांनी बीड येथून हे भेंडीचे बियाणं खरेदी केलं होतं. मात्र, बियाण्यातील दोष किंवा व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले.

पिकावर व्हायरस आल्याची तक्रार घेऊन संबंधित दुकानदाराकडे गेल्यानंतर, तेथून केवळ उडवाउडवीची उत्तरं मिळाल्याचा गंभीर आरोप विठ्ठल पवार यांनी केला आहे. औषधोपचार करूनही पीक वाचण्याची कोणतीही चिन्हे उरली नाहीत. उलट औषधांचा अतिरिक्त खर्च वाढत गेला. शेवटी हे आर्थिक नुकसान सहन करण्यापलीकडे कोणताही पर्याय उरला नसल्याने, संतप्त शेतकऱ्याने आपल्या दोन एकरांतील उभ्या पिकावर नाईिलाजाने रोटावेटर फिरवून संपूर्ण पीक मातीत मिळवले.

या घटनेमुळे ऐन दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांवर किती मोठे आर्थिक संकट ओढावले आहे, हे पुन्हा एकदा समोर आले असून, बनावट किंवा निकृष्ट बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Charging Safety Tips: मोबाईल चार्जिंग करताना ७ चुका कोणीही करू नका, होऊ शकतो मोठा स्फोट!

Maharashtra News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, ११ आरोपीना आज कोर्टात हजर करण्यात आले

Meenakshi Shinde : ठाण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! मीनाक्षी शिंदेंचा तडकाफडकी राजीनामा

Matar Pulao : हॉटेलसारखा मटार पुलाव कसा बनवायचा? योग्य प्रमाण आणि कृती जाणून घ्या

दररोज पाणी मिळणाऱ्या शहराला आता 8 दिवसांनी पाणीपुरवठा; श्रीरामपूरवर जलसंकट

SCROLL FOR NEXT