PETROL-DIESEL PRICE HIKE AGAIN IN MAHARASHTRA; FARMERS AND COMMON PEOPLE ANGRY OVER FUEL CRISIS saam tv
महाराष्ट्र

Petrol-Diesel Rate Rise: आठवडाभरात पेट्रोल-डिझेलची दुसऱ्यांदा दरवाढ; शेतकरी आणि सामान्यांच्या संतापाचा उद्रेक

Maharashtra Faces Fuel Crisis : आधीच प्रचंड तुटवडा. त्यात पुन्हा दरवाढीचा भडका उडालाय. आठवडाभरात सलग दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलीये. राज्यातील नेमकी स्थिती काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • आठवडाभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली.

  • पेट्रोल 91 पैशांनी तर डिझेल 94 पैशांनी महागले.

  • राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल तुटवडा निर्माण झाला आहे.

रोहित कदम, साम प्रतिनिधी

महाराष्ट्रात वाढत्या इंधन तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलाच हवालदिल झालाय. सध्या शेतीच्या मशागतीची कामं सुरू असल्यामुळे ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळवताना शेतकऱी मेटाकुटीला आलाय. पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यात पेट्रोल आणि डिझेलची आठवडाभरात दुसऱ्यांचा दरवाढ झालीय. पेट्रोल 91 पैशांनी तर डिझेल 94 पैशांनी महागलंय. याचा मोठा फटका राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांनाही बसतोय. नव्या दरवाढीमुळे कुठे किती दर आहे ते पाहूयात.

पेट्रोल-डिझेलमध्ये दुसऱ्यांदा दरवाढ

शहर पेट्रोल डिझेल

परभणी 109.49 95.96

नाशिक 108.84 95.35

नागपूर 108.07 94.63

पुणे 107.89 94.39

मुंबई 107.5994.08

खरीप हंगामापूर्वी शेतीच्या मशागतीची काम सुरू आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर करावा लागतोय. शेतकरी ट्रॅक्टर घेऊन पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी येत आहेत मात्र, गेल्या तीन दिवसांपासून डिझेल मिळत नसल्यानं शेतीचं कामं खोळंबल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय.

इराण-अमेरिका संघर्षामुळे होर्मुझ जलमार्ग अजूनही ठप्पच आहे. त्यामुळे काही आठवडे पुरेल एवढचा व्यापारी तेलसाठा सध्या शिल्लक असल्यां आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनं सांगतिलंय. त्यामुळे पुढील काळात इंधन टंचाई आणखी तीव्र होणार असल्य़ाचं दिसतंय. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलची आणखी दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. म्हणजे इंधन महाग तर होणार मात्र सध्याची परिस्थिती पाहता त्यासाठी मोठा सामान्य आणि शेतकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:पिंपरी चिंचवडमध्ये जुनी सांगवी परिसरामध्ये डीजे अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू

Shahi Paneer: रेस्टॉरंटसारखी मलाईदार आणि स्वादिष्ट शाही पनीर बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Cucumber Benefits : वजन कमी करण्यापासून शुगर कंट्रोलपर्यंत; काकडीमध्ये दडलंय आरोग्याचं गुपित, वाचा ५ जबरदस्त फायदे

Bank Strike: 11 सप्टेंबरला बँका बंद राहणार? देशभरातील ग्राहकांसाठी मोठी बातमी!

Prolonged sitting: तासन्‌तास एकाच जागी बसून राहता? सावधान! कॅन्सरमुळे मृत्यूचा धोका वाढत असल्याचा संशोधनातून धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT