Passengers reportedly face a cockroach menace in the AC and sleeper coaches of Maharashtra Express. saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्र एक्सप्रेस बनली ‘झुरळांचं माहेरघर’; एक्सप्रेस महागडं तिकीट पण प्रवाशांना आरामाऐवजी झुरळांचा त्रास

Cockroaches In Maharashtra Express AC and Sleeper Coaches : महाराष्ट्र एक्सप्रेसच्या एसी आणि स्लीपर कोचमध्ये झुरळांचा वावर असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. महागडं तिकीट घेऊनही स्वच्छतेअभावी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्र एक्सप्रेसच्या एसी आणि स्लीपर कोचमध्ये झुरळांचा त्रास

  • महागडं तिकीट देऊनही स्वच्छतेअभावी प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय.

  • ट्रेन क्रमांक 11040 मधील स्वच्छता आणि देखभाल व्यवस्थेवर प्रश्न

संजय जाधव, साम प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. गोंदिया ते कोल्हापूर धावणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसच्या एसी आणि स्लीपर कोचमध्ये झुरळांचं अक्षरशः साम्राज्य असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. प्रत्येक कोचमध्ये झुरळांचा वावर दिसून येत असल्याने आरामदायी प्रवासासाठी महागडं तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ट्रे्न क्रमांक 11040 असलेल्या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचे चित्र समोर आले आहे. पूर्वी या एक्सप्रेसमधील सेवा व्यवस्थित असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे; मात्र आता रेल्वेच्या स्वच्छता आणि देखभाल व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एसी कोचमध्येही झुरळांचा त्रास होत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. महागडे तिकीट काढून आरामदायी आणि स्वच्छ प्रवासाची अपेक्षा करणाऱ्या प्रवाशांना जर झुरळांच्या त्रासाला सामोरं जावं लागत असेल, तर रेल्वे प्रशासन नेमकं करतंय तरी काय? असा संतप्त सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत.

एकीकडे देशात बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवले जात असताना, दुसरीकडे धावत्या एक्सप्रेसमध्ये मूलभूत स्वच्छताही राखली जात नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन कोचची स्वच्छता, कीटक नियंत्रण आणि देखभाल व्यवस्था सुधारावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. एक महिला प्रवाशी म्हणाल्या की, आम्ही गोंदिया ते कोल्हापूर असा प्रवास करतोय. आमची सीट बी ४ मध्ये आहे.

रात्रीच्या वेळी कॉक्रोच दिसून लागलेत. बर्थवरती आणि चांदरीमध्येही कॉक्रोच दिसत आहेत. त्यामुळे रेल्वे व्यवस्थापनाने स्वास्थ सुविधा प्रवाशांना देत आहेत.एसीच्या बोगीमध्ये झुरळ आहेत. त्यामुळे जनरल डब्बातून प्रवास केला असता तर बरं झालं असतं. यासह रेल्वेमध्ये विकलं जाणारं पाणीही महागड्या दर विकलं जातंय. १५ रुपयांऐवजी प्रवाशांकडून २० रुपये घेतले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अभिजित दिपकेंसह सीपेजीचे ३ नेते कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी

Navratri Kamarband Designs : गरबा नाइटसाठी रॉयल लूक! घागरा चोळीवर ट्राय करा कंबरपट्टाचे 'हे' ७ सुंदर डिझाइन्स

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगारवाढ कधी होणार? एरियर आणि फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट समोर

Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर घरच्या घरी कसा चेक कराल? जाणून घ्या ७-२-२ चा नियम

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेला धोका, ते काहीही करू शकतात; आईने पोलिसांवर केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT