Senior Maharashtra leaders reportedly lobbying for their sons’ entry into the Legislative Council, sparking debate over dynasty politics. saam tv
महाराष्ट्र

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

Maharashtra Politics: मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांनी लॉबिंग सुरु केलीय... विधानपरिषदेत आपल्या मुलांच्या माध्यमातून घराणेशाही राबवण्याचा प्रकार नेमका कोणत्या नेत्यांनी सुरु केलाय.. नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार जाणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..

Saam Tv

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांवरून महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला नसताना महायुतीतील बड्या नेत्यांनी आपल्या मुलांना सेट करण्यासाठी कंबर कसलीये. आपल्या मुलांसह नातेवाईकांचे राजकीय करिअर 'सेट' करण्यासाठी सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची जोरदार धडपड सुरू आहे. इतकंच नव्हे तर विधान परिषदेच्या आमदारकीसाठी काही बड्या नेत्यांनी मतदारसंघही फिक्स केल्याची चर्चा सध्या पाहायला मिळतेय.

रायगडमधून भरत गोगावले मुलगा विकास गोगावलेला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे अनिकेत तटकरेंसाठी लॉबिंग करत असल्याची चर्चा आहे...

जळगावमधून शिंदेसेनेचे गुलाबराव पाटील मुलगा प्रताप पाटलांसाठी तर किशोर पाटील मुलगा सुमित पाटीलसाठी विधानपरिषदेसाठी इच्छुक आहेत...

तसंच, परभणी-हिंगोली विधानपरिषदेतून अर्जुन खोतकर मुलगा अभिमन्यूसाठी आणि गोपीकिशन बाजोरिया हे मुलागा विप्लवला उमेदवारी मिळावी म्हणून धडपड करताना दिसतायत...

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि इतर पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. नेत्यांची आपल्या मुलांसाठीची ही धडपड पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी मात्र चिंतेची बाब ठरताना दिसतेय. अशा पद्धतीने आजी-माजी आमदारांकडून आपल्या नातलगांसाठी लॉबिंग केली जात असेल तर निष्ठावान कार्यकर्त्यांनी करायचं काय?, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय. त्यामुळे नेत्यांची ही धडपड पाहता आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीतही घराणेशाहीची परंपरा कायम राहण्याची शक्यता आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT