No Water for Ganesh Visarjan saam tv
महाराष्ट्र

गणपती विसर्जनावर दुष्काळाचं सावट, मराठवाड्यात नदी, धरण, विहिरी कोरड्या, पाण्याविना गणपतीचं विसर्जन रखडणार?

दुष्काळामुळे गणेशभक्तांपुढे नवं संकट उभं राहिलंय. अनेक जिल्ह्यांमध्ये सर्व नद्या, नाले आणि विहिरी कोरड्या पडल्यामुळे गणपती विसर्जनाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. काही ठिकाणी तर थेट गणेशभक्तांनी बाप्पाची मूर्ती तहसील कार्यालयांबाहेर आणून ठेवलीय. नेमकं काय सुरू आहे...पाहूयात हा रिपोर्ट.......

Suprim Maskar

राज्यभरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असतानाच, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मात्र अत्यंत गंभीर चित्र पाहायला मिळतय.... तीव्र दुष्काळ, पाण्याचा प्रचंड तुटवडा आणि प्रशासनाविरोधात असंतोष यामुळे यंदाचा गणेश विसर्जन सोहळा आंदोलनांचे केंद्र बनलाय...

धाराशिव जिल्ह्यात ऐन गणेश विसर्जनाच्या तोंडावर नदी, नाले, धरण आणि विहिरी कोरड्या ठाक पडल्यायत. गणपतीचं मुख्य विसर्जन केंद्र असलेल्या मांजरा नदीलाही पाणी नाही. यामुळे घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचं विसर्जन कुठं करायचं असा गंभीर प्रश्न गणेश भक्तांसमोर निर्माण झालाय....दुसरीकडे लातूरच्या रेणापूर तालुक्यात तलावात पाणी नसल्यामुळे नागरिकांनी अनोखे आंदोलन केलंय... विसर्जनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने खलंगरी गावातील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाजत-गाजत मिरवणूक काढून बाप्पा थेट रेणापूर तहसील कार्यालयाच्या दारात आणून ठेवला....

अमरावती शहरातही विसर्जनासाठी तलावात पाणी नसल्याने टँकरच्या साह्याने महानगरपालिकेच्या वतीने तलाव भरणे सुरू आहे...त्यामुळे महापालिकेनं ऐन दुष्काळात टँकरनं विसर्जनासाठी तलाव भरण्यासाठी टँकरच्या पाण्याचा वापर केल्यानं काही जणांनी नाराजी व्यक्त केलीय...दुष्काळामुळे मराठवाडा कोरडा पडलाय. त्यामुळे बाप्पाच्या विसर्जनाचं संकट निर्माण झालंय. आधीच बाप्पाला निरोप देण्याची वेळ आल्यामुळे भक्त गहिवरले आहेत. त्यात आता पाणी नसल्यामुळे बाप्पाचं विसर्जन कसं करायचं असा मोठा गंभीर प्रश्न भक्तांपुढे निर्माण झालाय. आता शासकीय पातळशीवर हे विघ्न दूर होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्याला पोळा पडला महागात, बैलानं घेतला सोन्याचा घास, पोटातली चेन काढण्यासाठी ऑपरेशन गोल्ड

ज्ञानेश कुमार गृहमंत्र्यांचे शार्प शूटर आणि छोटा शकील, राऊतांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल

Today’s Horoscope: 12 राशींचं भविष्य जाणून घ्या; कोणाला मिळणार नवी संधी, कोणासाठी दिवस असेल खास?

लाऊडस्पीकर लावायचाय, एक लाख भरा! गणपती मिरवणुकीत ध्वनीप्रदूषणाला आळा

Maharashtra News Live Update: IIT बॉम्बे कॅम्पसमध्ये साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण,कुटुंबाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT