MAHARASHTRA DROUGHT CRISIS saam tv
महाराष्ट्र

बळीराजा दुष्काळात होरपळला; पावसाची दडी, राज्यावर दुष्काळाचं सावट

Maharashtra Drought Scare: राज्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चाललीय. तब्बल दीड महिन्यापासून पावसानं पाठ फिरवल्यानं 50 ते 80 टक्क्यांपर्यंत शेतातलं उत्पादन घटलंय. राज्यातल्या कोणत्या विभागावा सर्वाधिक फटका बसलाय.? आणि सरकार काय पावलं उचलतंय?

Suprim Maskar

मराठवाड्यात पावसानं दांडी मारल्यानं दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय.. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तब्बल दीड महिना पाऊस न पडल्यानं हाता-तोंडाशी आलेली खरीपाची पिकं पूर्णपणे उन्मळून पडलीयत. मका, सोयाबीन, कापूस, भुईमुगासह अनेक पिकांच्या उत्पादनात मोठी घट झालीय... कोणत्या पिकांच्या उत्पादनात किती घट झालीय.

पीक उत्पादनातील घट

कापूस 40-50%

सोयाबीन 50-60%

मका 40-50%

तूर 30-40%

मूग 30-40%

उडीद 40-50%

बाजरी 30-40%

दरम्यान धाराशिव जिल्ह्यात भीषण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली.. गौरी गणपतीत लक्ष्मीपुढे ठेवायलाही धान्य नाहीत, करपुन गेलेले सोयाबीन काढून जनावरांना चारा दिला जात असल्याचं धक्कादायक वास्तव शेतकऱ्यांनी मांडलयं. मराठवाडा विदर्भ आणि खान्देशातली अनेक जिल्ह्यात महिनाभर पावसानं दडी मारल्यानं खरीपात पिकांचं नुकसान झालंय.... त्यामुळे मंत्रीमंडळ बैठकीत मंत्र्यांनीही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलीय. त्यात पुढील आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन मदत जाहीर करू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलयं..

प्रशासन दुष्काळासंदर्भात सध्या मंडळनिहाय आकडेवारी गोळा करत असून ऑक्टोबरच्या सुरुवातीला प्रत्यक्ष पंचनामे करून अहवाल तयार केला जाणार आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 12 ऑक्टोबरपूर्वी राज्यात दुष्काळ जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय... त्यामुळे प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदतीचा हात कधी मिळणार, याकडे बळीराजाचे डोळे लागून राहिलेत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळाची बनावट यादी प्रसारित करणाऱ्या विरोधात कार्यवाही होणार- कृषी मंत्री दत्ता भरणे

Home Gardening : बाल्कनीपासून बेडरूमपर्यंत घरातील प्रत्येक कोपऱ्यात कोणती झाडे कुठे लावावीत? जाणून घ्या

मुंबई सी-लिंकवर अवजड ट्रकचा धुमाकूळ; नियम धाब्यावर, भरधाव वेगाने लेन बदलत प्रवास

IPS Officer: ३५ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; युपी पोलीस दलात मोठा फेरबदल

काँग्रेसचा दारुण पराभव; अपक्ष उमेदवाराचा दणदणीत विजय, भाजप प्रणित संघटनेची काय स्थिती?

SCROLL FOR NEXT