Dharashiv farmer son follows father fearing saam tv
महाराष्ट्र

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

'I Follow My Father Because He Said He Wants to Die: राज्यात दुष्काळानं शेतकऱ्याचं कंबरडं पुरतं मोडून गेलयं...अशातच धाराशिवमधील एका शेतकरी पूत्रानं नेत्यांसमोर मांडलेल्या व्यथेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय... वडील आत्महत्या करतील म्हणून मुलानं काय केलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या बापानं लेकासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचं सांगितलं आणि लेकरानं त्या वाक्याचा धसकाच घेतला... बापानं आत्महत्या केली तर आपल्या कुटुंबाचं काय होईल? या एकाच भीती मनात घेऊन हे लेकरू आपल्या बापाच्या मागे सावलीसारखं फिरतय...

धाराशिव जिल्ह्यातील खानापूर परिसरातील शेतकऱ्याचा हा महम्मद अल्ताफ हा मुलगा....उध्वस्त झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे धाराशिवच्या दौऱ्यावर गेले..त्याचवेळी शेतात पाऊल टाकताच, मोहम्मद आदित्य ठाकरेंच्या समोर आला. आणि त्यानं जे सांगितलं ते एेकून सगळेच हबकून गेले

खरीप हातातून गेलं, रब्बीचा भरोसा उरलेला नाही... घरात अन्नाचा एक कण नाही... त्यामुळे अख्ख्या जगाशी एकहात करणारा बापही आपल्या लेकरापुढे कसा हतबल झालाय... ऐका...बापासाठी चिमुकल्याची सुरू असलेली ही केविलवाणी धडपड पाहून आदित्य ठाकरेही गहिवरले. त्यांनी तातडीने त्या कुटुंबाला आर्थिक मदत देत, "आम्ही तुमच्या पाठीशी आहोत," असा धीर दिला....

एकीकडे निसर्गाची अवकृपा अन् दुसरीकडे प्रशासनाची उदासीनता... या दुहेरी संकटात सापडलेल्या बापाची होणारी तडफड या लहानग्याच्या कोवळ्या मनावर कायमची कोरली गेलीय... शेतात राबणाऱ्या बापाच्या गळ्याभोवतीचा फाशीचा दोर चुकवण्यासाठी पोरगा त्यांची सावली झालाय.. यापेक्षा दुसरं मोठं दुर्देव नाही...धाराशिवमधील महम्मद अल्ताफची ही करूण कहाणी फक्त एका शेतकरी कुटुंबाची व्यथा नाही तर ती संपूर्ण राज्यातील बळीराजा दुष्काळात कसा पुरता होरपळून निघालाय याची साक्ष देतोय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

शिंदेसेना मंत्रिपदाची भाकरी फिरवणार? दसऱ्यानंतर शिंदेसेनेत फेरबदलाचे संकेत

अभिजित दिपकेंना सशर्त जामीन मंजूर, कुमारांविरोधातील आंदोलन थंडवणार की चिघळणार? तिहारमध्ये असलेल्या दास आणि रांकांचं काय होणार?

SCROLL FOR NEXT