महाराष्ट्र

Maharashtra Drought: काँग्रेस नेते करणार दुष्काळी भागाची पाहणी; ४ समिती स्थापन

Maharashtra Drought: राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्यांची मोठी समस्या आहे. राज्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी काँग्रेस नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागनिहाय दुष्काळ पाहणी समित्यांची स्थापन केलीय. या समित्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून विभागीय आयुक्तांना आणि प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करणार आहेत. येत्या ३० आणि ३१ मे रोजी सर्व महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. सर्व आमदारांचा सहभाग या समितीत असणार आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर करणार दुष्काळाची चर्चा.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,बाळासाहेब थोरात,पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली चार समित्याची स्थापना करण्यात आलीय. या समित्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून विभागीय आयुक्तांना निवदेन देणार आहे. प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेवरून विभागावर जबाबदारी सोपवण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,बाळासाहेब थोरात,पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली चार समित्याची स्थापना करण्यात आलीय. या समित्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून विभागीय आयुक्तांना निवदेन देणार आहे. प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेवरून विभागावर जबाबदारी सोपवण्यात आली.

नाना पटोले हे मराठवाडा विभागाच्या समितीचे प्रमुख आहेत. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र विभागाची जबाबदारी दिलीय. नागपूर विभागाच्या समितीचे प्रमुख विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत. पश्चिम महाराष्ट्राचे समिती प्रमुख माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. कोकण विभाग समितीचे प्रमुख प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान आहेत तर अमरावती विभाग समिती प्रमुख माजी मंत्री यशोमती ठाकूर आहेत. या समितीत राज्यातील प्रमुख नेते, आमदार, माजी मंत्री, पदाधिकारी यांचाही समावेश आहे. ही समिती दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार असून विभागीय आयुक्तांना निवेदन देणार आहेत तसेच प्रदेश काँग्रेसला आपला अहवाल देणार आहेत.

राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्यांची मोठी समस्या आहे. रोजगारही मिळत नाहीत. राज्यातील महाभ्रष्टयुती सरकारला दुष्काळाची चिंता नाही. जनता दुष्काळाने होरपळ असताना महायुती राजकीय साठमारीत व्यस्त असल्याची टीका काँग्रेसकडून केली जात आहे. राज्यातील दुष्काळ भागात जाऊन काँग्रेसचे आमदार परिस्थिती जाणून घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT