माधव सावरगावे, साम टीव्ही
राज्यातील दुष्काळी पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक उद्यापासून राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात हे पथक छत्रपती संभाजीनगर विभागातही पाहणी करणार आहे. हे पथक तीन दिवस राज्यात तीन वेगवेगळ्या गटांमध्ये पाहणी करणार आहे. दि. ८ ते ११ या कालावधीत ही पाहणी होईल.
- पथक क्र १- पश्चिम महाराष्ट्र: अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्याची पाहणी करणार.
- पथक २ - मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्याची पाहणी करणार.
- पथक ३ - विदर्भ: यवतमाळ, वाशिम आणि लगतच्या टंचाईग्रस्त भागाची पाहणी करणार.
पहिला दिवस, दि. ८रोजी - सकाळी 7:30 वा. केंद्रीय पथकाचे सदस्य छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे दाखल होतील. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक होईल. दुपारी 2:30 नंतर सर्व पथके आपापल्या विभागाकडे रवाना होतील. उद्या संध्या. 7:30 वाजता नवी मुंबईहून विमानाने छत्रपती संभाजीनगरला प्रस्थान. रात्री 9 वाजता विश्रामगृहात आगमन आणि विभागीय आयुक्तांशी चर्चा.
दि.9 रोजी सकाळी 9 ते 12:45 पर्यंत छत्रपती संभाजीनगर-शेंद्रा जालना- नानेगाव, किनगाव वाडी, जामखेड ता. बदनापूर, अंबड) येथील कमी पावसाच्या तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात पाहणी.
दुपारी 2 ते 5 पर्यंत बीड जिल्ह्यातील गेवराई (अर्धमसला, पारगाव जप्ती) येथे पाहणी. बीड येथे मुक्काम .
दि.10 रोजी सकाळी 9 ते 12 पर्यंत बीड जिल्ह्यातील मंजरसुंभा, खंडाळा, वैद्य किन्ही, सोनेगाव, पाटोदा तालुक्यातील टंचाईग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 12 ते 1 बीड जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर मार्गे नवी मुंबईला प्रयाण.
या पाहणीनंतर केंद्रीय पथक आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार असून त्यानंतरच महाराष्ट्रासाठी NDRF च्या मदतीबाबत निर्णय होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.