Dhananjay Munde Saam TV News
महाराष्ट्र

छोड आये हम वो गलियाँ... राजकारणापासून विश्रांती, धनंजय मुंडे विपश्यना केंद्रात दाखल, १० दिवस विपश्यना !

Dhananjay Munde : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे क्रूर छायाचित्र आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंना अन्न व नागरी पुरवठा खात्याचा राजीनामा द्यावा लागला होता.

Prashant Patil

नाशिक : मंत्रीपदाचा राजीनामा, संतोष देशमुख प्रकरणात होणारे गंभीर आरोप, करुणा शर्मांचे आरोप अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे आता मन:शांतीकडे वळाले आहेत. धनंजय मुंडे आता नाशिकमधील इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात दाखल झाले आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे खाते राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांना देण्यात आले. त्यानंतर धनंजय मुंडे थेट विपश्यना करण्यासाठी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात गेल्या आठ दिवसांपासून असल्याची माहिती समोर आली आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे क्रूर छायाचित्र आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंना अन्न व नागरी पुरवठा खात्याचा राजीनामा द्यावा लागला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. राजीनाम्यानंतरही करुणा मुंडे यांच्या गंभीर व खळबळजनक आरोपांमुळे धनंजय मुंडे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

मागील आठ दिवसांपासून आमदार धनंजय मुंडे नाशिक मधील इगतपुरीच्या विपश्यना केंद्रामध्ये दाखल झाले आहेत. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. नंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या खात्याची जबाबदारी अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांना दिल्यानंतर धनंजय मुंडे आता थेट विपश्यना करण्यासाठी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रामध्ये गेले आहेत. इगतपुरीच्या विपश्यनाकेंद्रात १० दिवसांच्या विपश्यनेसाठी ते दाखल झाल्याचं सांगण्यात येतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro New Line: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आणखी एक मेट्रो मार्ग सुरू होणार, उद्घाटनाची तारीख ठरली, कोणत्या भागाला होणार सर्वाधिक फायदा?

Maharashtra Live News Update: मंगळवेढा नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीला स्थगिती ,जिल्हाधिकारी यांची माहिती

Malaika Arora: मलायका अरोरा ज्याच्या प्रेमात पडली; तो हर्ष मेहता आहे कोण?

Accident: महामार्गावर अपघताचा थरार! भरधाव टेम्पो अन् कारची समोरासमोर धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू

पुण्यातील बुधवार पेठेत भयंकर घडलं; चिठ्ठी लिहून तरूणीनं ९व्या मजल्यावरून उडी घेतली, आत्महत्या करण्यामागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT