Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

"जाती-जाती, धर्मात अंतर करणाऱ्यांना कोल्हापूर निवडणुकीतून चपराक दिली"

साम टिव्ही ब्युरो

कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Kolhapur by election) काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayshree jadhav) तब्बल १८९०१ मताधिक्यानं विजयी झाल्या. भाजपचे सत्यजित कदम यांचा पराभव केल्याने जयश्री जाधव यांचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी अभिनंदन केले होते. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार अशी महत्वाची लढत कोल्हापूरच्या उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पाहायला मिळाली. कोल्हापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्पसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. यावेळी पवार म्हणाले, जे लोक जाती-जाती धर्मात अंतर करत होते, त्यांना कोल्हापूर निवडणुकीतून चपराक दिलीय. कारण नसताना दोन समाजात तेढ निर्माण करून आपल्याला पुढे जाता येत नाही. जोवर कार्यकर्ता पेटून उठत नाही, तोवर आपल्या जागा वाढणार नाही. अशी टीका करत पवार यांनी विरोधकांवर राष्ट्रवादीच्या संकल्पसभेत प्रहार केला आहे.

कोल्हापूरमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या संकल्पसभेत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे बडे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित आहेत. या संकल्पसभेत उपमुख्यमंत्री पवार यांनी महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवार म्हणाले, दोन वर्षे कोरोनात गेली. कोरोनातूनही आपण सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. महागाई वाढत आहे. गॅस, सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. त्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून हे सर्व सुरू आहे.

असा हल्लाबोल पवार यांनी केंद्र सरकारवर केला. तसंच निवडणुका लागल्या तर आपल्याला तत्पर असले पाहिजे. जोवर कार्यकर्ता पेटून उठत नाही तोवर आपल्या जागा वाढणार नाही. कार्यकर्त्यांना पद मिळाली पाहिजे यासाठी निवडणूका जिंकायला हव्या. असे आवाहनही पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना या संकल्प सभेतून केले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा अनुदान दिलं. तसंच दोन लाखापर्यंत कर्ज माफ केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. असा ठाम निर्धारही यावेळी त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही त्यांनी नाव घेता टोला लगावला. गुढीपाडव्यानंतर काही जणांनी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू केला. असे म्हणर पवार यांनी ठाकरेंवर टीका केली.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Park: प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

Jammu Kashmir Exit Polls : जम्मू-काश्मीरमध्ये येणार 'इंडिया आघाडी'चं सरकार, भाजपला बसणार धक्का? जाणून घ्या EXIT POLL चा अंदाज

Marathi News Live Updates :हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न, जम्मूत भाजपची सत्ता; एक्झिट पोलचे आकडे आले

Navratri 2024: देवीला दाखवा हा नैवेद्य; इच्छा होतील पूर्ण

Haryana Election Exit Poll : हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेसचं सरकार? भाजपची हॅट्ट्रिक हुकणार, जाणून घ्या Exit Poll चे अंदाज

SCROLL FOR NEXT