Maharashtra Day : राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी, तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ‘देखो आपला महाराष्ट्र’ हे महाराष्ट्र अंतर्गत टूर पॅकेज सुरु करण्यात येत आहे. मात्र यावर टीकेचा भडिमार होताना दिसतोय. (Latest Marathi News)
महाराष्ट्र (Maharashtra) पर्यटन विभागाने हे पोस्टर त्यांच्या अधिकृत वेब साईटवरून रिलिज केल्यानंतर त्यावरील 'देखो आपला महाराष्ट्र' हे वाक्य पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. छत्रपतींच्या महाराष्ट्रात होणारी मराठीची ही गळचेपी असल्याची भावना नागरिक व्यक्त करत असून पोस्टरवरील 'देखो आपला महाराष्ट्र' या वाक्याच्या उल्लेखावरून आता नवीन वाद पेटण्याची चिन्ह आहेत.
महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संधेला सरकारमार्फत अपलोड करण्यात आलेल्या या पोस्टरवरून पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर ही नेटकरी टिका करत आहेत.
टूर पॅकेजमध्ये आहे तरी काय?
गड किल्ले, जागतिक वारसा स्थळे, साहसी पर्यटन, समुद्रकिनारे, जंगल सफारी, संग्रहालये, स्मारके, थंड हवेची ठिकाणे, एमटीडीसी सह असे आणि बरेच अनुभव घ्या, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.
• भव्य महाराष्ट्र: महाराष्ट्र अँड क्वाड्रिलॅटरल टूर, ट्राइबल एक्सपीरिअन्स, रॉयल महाराष्ट्र, आणि अशाच अधिक सात सहली
• आमची मुंबई: मुंबई देखो (तीन विविध सहली)
• वाइल्डलाइफ विदर्भ: सेंटर ऑफ इंडिया नागपूर टूर्स,
टायगर टेल्स टूर, आउटडोअर म्युझियम टूर आणि पाच तत्सम टूर्स
• मिस्टिकल अमरावती: ग्रेटर क्रेटर टूर मॅजिकल मेळघाट टूर
आणि दोन तत्सम सहली
• हेरिटेज ऑफ छत्रपती संभाजीनगर: कैलास दी वर्ल्ड वंडर टूर,
एलोरा अजिंठा हेरिटेज टूर आणि अधिक आठ तत्सम सहली
• मेस्मरायजिंग कोकण कोकणी रिव्हेरा, बीच हॉलिडे टूर्स, टेम्पल शोअर टूर आणि अशाच अधिक दहा सहली
• कल्चरल पुणे: स्ट्रॉबेरी कॉलिंग टूर, हिल स्टेशन टूर्स, फोर्ट ट्रेल, आणि असाच अधिक सात सहली
• स्पिरीचुअल नाशिक: नाशिक सीटी टूर, एडवेंचरस सह्याद्री आणि तत्सम चार सहली
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.