Government initiates action against over 10,000 employees found taking fraudulent benefits under the Ladki Bahin Scheme Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Maharashtra Ladki Bahin Yojana Fraud KYC: सरकारची तिजोरी लुटून तुंबड्या भरणाऱ्या बोगस सरकारी लाडक्यांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने पत्र जारी केलंय.. मात्र बोगस सरकारी लाडक्यांवर नेमकी काय कारवाई केली जाणार..

Bharat Mohalkar

लाडकी बहीण योजनेचा बोगस लाभ लाटलेल्या बोगस सरकारी लाडक्यांचे धाबे दणाणलेत...कारण ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ लाटलाय.. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.. एवढंच नाही तर लुटलेले पैसे वसुल करण्यासह वेतनवाढही रोखण्याची शक्यता आहे... मात्र कुणाची पगारवाढ रोखणार?

लाडकी लाभार्थी कर्मचाऱ्यांची पगारवाढ रोखणार

सरकारी कर्मचारी-5 हजार

शिक्षक-3 हजार

काही जिल्हा परिषद कर्मचारी

काही पोलिसांकडूनही योजनेचा लाभ

आता राज्यात लाडकीचा लाभ लाटलेल्या 10 हजार पेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता विरोधकांनी मात्र सरकारला घेरलंय...

विधानसभा निवडणुकीआधी घाईघाईने लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली.. मात्र महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडकीची छाननी सुरु केली.. त्यात अडीच कोटींपैकी 25 लाख लाडक्या बहीणींना वगळण्यात आलंय... तर ई-केवायसी न केल्यानं राज्यातील जवळपास दीड कोटी लाडक्या बहीणींचे हप्ते स्थगित करण्यात आलेत.... मात्र योजना सुरु झाल्यानंतर कागदपत्रांची छाननी न केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करुन कामात हयगय केल्याबद्दल कारवाई करण्यात येणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा शहरात गटविकास अधिकाऱ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड

'V' Neck ब्लाउजची क्रेझ; साडीला देईल रॉयल लूक, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Father Of Anushka Sharma: कडक शिस्त अन् देशाचे संरक्षक, अभिनेत्री अनुष्का शर्माचे वडील काय काम करायचे ?

Crime: कोचकडून महिला खेळाडूवर बलात्कार, हॉटेलवर सरावासाठी बोलावलं अन्...; करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी

Viral Video : एकमेकींचे केस ओढले, रस्त्यात राडा घातला; प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची फ्री स्टाईल हाणामारी

SCROLL FOR NEXT